घरदेश-विदेश'जास्त धान्य मिळवण्यासाठी जास्त मुले जन्माला घाला', तीरथ सिंह रावत पून्हा बरळले

‘जास्त धान्य मिळवण्यासाठी जास्त मुले जन्माला घाला’, तीरथ सिंह रावत पून्हा बरळले

Subscribe

विरोधी पक्षांनी केली राजीनाम्याची मागणी

उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत महिल्यांच्या कपड्यांवरून केलेल्या वादग्रस्त विधानामुळे टीकेचे धनी ठरले. देहराडूनमधील एका कार्यक्रमात रावत यांनी फाटलेली जीन्स घालणारी महिला आपल्या मुलांवर काय संस्कार करणार असा सवाल करत वाद निर्माण केला. यामुळे सर्वच स्तरातून त्यांच्यावर जोरदार टीका होऊ लागली. विरोधी पक्षांनी तर त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. यातच रावत यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. अधिक धान्य मिळवण्यासाठी तुम्ही अधिक मुले जन्माला का नाही घालत? असे प्रश्न उपस्थितांना करत रावत यांनी नवा वाद ओढावून घेतला आहे.

- Advertisement -

नैनीताल जिल्ह्यातील रामनगरमध्ये आयोजित एका कार्यक्रमात धान्यवाटपाविषयी बोलताना ते बरळले आहेत. कोरोना काळात कुटुंबातील प्रत्येक सदस्याला ५ किलो धान्य मिळाले. ज्यांच्या घरात १० जण आहेत त्यांना ५० किलो धान्य मिळाले, तर २० सदस्य असणाऱ्या घरात एक क्लिंटल धान्य मिळाले. २ सदस्य असणाऱ्या कुटुंबाला फक्त १० किलो तांदूळ मिळाले. यामुळे अनेक कुटुंबांनी ते धान्य साठवले आणि विकले सुद्धा. असे रावत म्हणाले.

मी असा चांगला तांदुळ कधीही सामान्य जीवनात खाल्लेला नाही. परंतु यानंतर ईर्ष्या होऊ लागली की, मला तर दोनचं मुले आहेत म्हणून फक्त १० किलोच धान्य मिळाले. पण २० सदस्य असणाऱ्यांनी एक क्विंटल धान्य का मिळाले? यात दोष कुणाचा? त्यांनी २० मुले जन्माला घातली म्हणून त्यांना एक क्विंटल धान्य मिळाले. पण तुम्ही दोनचं मुलं जन्माला घातली म्हणून तुम्हाला फक्त १० किलोचं धान्य मिळाले. यात ईर्ष्या करण्याचे कारण काय? जेव्हा वेळ होता तेव्हा तुम्ही दोनचं मुले जन्माला घातली. पण २० मुलं का नाही जन्माला घातली. यात दोष कुणाचा? असं तीरथ सिंह रावत म्हणाले. या वादग्रस्त वक्तव्यमुळे रावत पुन्हा अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. रावत यांना आधीच्या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर बरंच ट्रोल करण्यात आले. यातच आता मुले जन्माला घालण्याच्या वक्तव्यावरून पून्हा ट्रोल केले जात आहेत. यावर अनेक मीमन्स सध्या सोशल मीडियावरही व्हायरल होऊ लागले आहेत.

- Advertisement -

उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत देहराडूनमधील एका कार्यक्रमात बोलताना महिल्यांच्या फाटलेल्या जीन्सवरुन संस्कारावर टीका केली. आजकाल महिला फाटलेली जीन्स वापरतात, हे बरोबर आहे का? हे कसले संस्कार? महिलांच्या गुडघ्यावर फाटलेल्या जीन्स पाहून समाजात काय संदेश जाईल? मुलांवर कसले संस्कार होणार? हे सर्व पालकांच्या हाती असते. एका स्वयंसेवी संस्थेत कार्य करणारी महिला जर असे कपडे घातल असेल तर समाजात कशाप्रकारचे संस्कार होतील? अशी वादग्रस्त टीका तीरथ सिंह रावत यांनी केली आहे. तीरथ सिंह रावत वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच टीकेचे धनी होत असतात. याआधीही त्यांनी पंतप्रधान मोदींची तुलना भगवान राम आणि कृष्ण देवतेशी करत वाद ओढावून घेतला होता.


हेही वाचा- #RippedJeansTwitter: फाटलेल्या जीन्स प्रकरणी मुख्यमंत्री तीरथ सिंह यांचा माफीनामा

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -