Letter Bomb: काँग्रेसच्या गोटात हालचाली; एच.के. पाटील यांनी घेतली बैठक

हायकमांडने मागवला अहवाल

HK Patil speaks to Nana Patole, Ashok Chavan and Balasaheb Thorat on VC over Vaze case and parambir singh letter
Letter Bomb: काँग्रेस प्रभारी एच.के. पाटील यांनी घेतली; हायकमांडने मागवला अहवाल

राज्यात सचिन वाझे प्रकरणावरुन वादंग सुरु असताना मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या लेटर बॉम्बने खळबळ उडाली आहे. या लेटर बॉम्बनंतर आता काँग्रेसच्या गोटात हालचाली सुरु झाल्या आहेत. महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी एच.के. पाटील यांनी रविवारी रात्री सचिन वाझे प्रकरण आणि परबीर सिंग यांच्या पत्रावर व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली. या बैठकीला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले,अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात हे प्रमुख नेते उपस्थित होते. परमबीर सिंग यांच्या पत्राने सरकारच्या प्रतिष्ठेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. हे डॅमेज कंट्रोल करण्यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस बाजू लावून धरत असताना काँग्रेस कुठेच दिसत नाही आहे. दरम्यान, आता या सगळ्या घडामोडी नंतर काँग्रेसच्या गोटात हालचाली सुरु झाल्याचं दिसत आहे.

परमबीर सिंग यांच्या लेटर बॉम्ब प्रकरणावर महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी एच. के. पाटील यांनी काँग्रेसची रात्री व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली. एच. के. पाटील यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, अशोक चव्हाण
आणि बाळासाहेब थोरात यांच्यासोबत चर्चा केली. राज्यातील घडामोडींचा अहवाल हायकमांडने काँग्रेसच्या नेत्यांकडून मागवला आहे. त्यामुळे आता या प्रकरणावर काँग्रेस काय भूमिका घेतं हे पाहणं महत्त्वाचं आहे.

तेव्हा अमित शहांचा राजीनामा घेतला होता का?

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपानंतर काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी पत्रकारपरिषद घेतली होती. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला. २००२ साली अमित शहा गुजरातच्या गृहराज्यमंत्रीपदी होते तेव्हा तत्कालीन पोलीस प्रमुख डी.जी. वंजारा यांनी अमित शहा यांच्यावर गंभीर आरोप केले होते. तेव्हा भाजपने अमित शहा यांचा राजीनामा घेतला होता का? असा सवाल काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी उपस्थित केला होता.


हेही वाचा – पवारांचा गुगली फेल; लेटर बॉम्ब प्रकरणाची चौकशी करण्यास रिबेरो यांचा नकार