घरदेश-विदेशCNG price hike: सीएनजीच्या दरात पुन्हा वाढ; 'या' शहरांत सर्वाधिक महाग

CNG price hike: सीएनजीच्या दरात पुन्हा वाढ; ‘या’ शहरांत सर्वाधिक महाग

Subscribe

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ सुरू असतानाच गुरूवारी दिलासादायक बातमी समोर आली आहे. आज इंधनाचे दर स्थिर असून, त्यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मात्र सीएनजीच्या (CNG) दरात वाढ करण्यात आली आहे. सीएनजीच्या किमतीत वाढ थांबलेली नाही.

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ सुरू असतानाच गुरूवारी दिलासादायक बातमी समोर आली आहे. आज इंधनाचे दर स्थिर असून, त्यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मात्र सीएनजीच्या (CNG) दरात वाढ करण्यात आली आहे. सीएनजीच्या किमतीत वाढ थांबलेली नाही. गुरुवारी इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेडनं (IGL) सीएनजीच्या किमतीत २.५ रुपयांनी वाढ केली आहे. त्यामुळं आयजीएलनं देशाची राजधानी दिल्लीत सीएनजीची किंमत २.५ रुपये प्रति किलोने वाढवून ६९.११ रुपये प्रति किलो केली आहे. त्याचवेळी गाझियाबाद, नोएडा आणि ग्रेटर नोएडामध्ये सीएनजीची किंमत ७१.६७ रुपये प्रति किलो झाली आहे. गुरुग्राममध्ये त्याची किंमत ७७.४४ रुपये प्रति किलो झाली आहे.

इतर शहरातील सीएनजीचे दर?

- Advertisement -
  • मुझफ्फरनगर, मेरठ आणि शामली – 76.34 रुपये प्रति किलो
  • रेवाडी – 79.57 रुपये प्रति किलो
  • कर्नाल आणि कैथल – 77.77 रुपये प्रति किलो
  • कानपूर, हमीरपूर आणि फतेहपूर – 80.90 रुपये प्रति किलो
  • अजमेर, पाली आणि राजसमंद – 79.38 रुपये प्रति किलो

कुठे सीएनजी स्वस्त, कुठे महाग?

कानपूर, हमीरपूर आणि फतेहपूरमध्ये सीएनजीच्या किमतीत सर्वाधिक वाढ झाली आहे. त्या तुलनेत दिल्लीमध्ये सीएनजी स्वस्त आहे. याआधी बुधवारीही सीएनजीच्या दरात अडीच रुपयांनी वाढ करण्यात आली होती. या महिन्याच्या सुरुवातीलाही दरात वाढ करण्यात आली होती. अशा स्थितीत मार्च महिन्यात सीएनजीच्या दरात एकूण ९.१ रुपयांनी वाढ झाली आहे. व्हॅट सारख्या स्थानिक करांवर आधारित किमती शहरानुसार बदलतात.

- Advertisement -

हेही वाचा – Petrol-Diesel Price: पेट्रोलच्या दरवाढीतून दिलासा; जाणून घ्या आजचे दर

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -