घरदेश-विदेशPetrol-Diesel Price: पेट्रोलच्या दरवाढीतून दिलासा; जाणून घ्या आजचे दर

Petrol-Diesel Price: पेट्रोलच्या दरवाढीतून दिलासा; जाणून घ्या आजचे दर

Subscribe

मुंबईसह देशभरात गेल्या अनेक दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहेत. गेल्या १६ दिवसांत १४वेळा पेट्रोलची दरवाढी झाली आहे. सध्याच्या दरवाढीनुसार मुंबईत पेट्रोलचे दर प्रति लीटर १२०.५१ रुपये आहे. तसंच, डिझेलचे दर प्रति लीटर १०४.७७ रुपये आहे.

मुंबईसह देशभरात गेल्या अनेक दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहेत. गेल्या १६ दिवसांत १४वेळा पेट्रोलची दरवाढी झाली आहे. सध्याच्या दरवाढीनुसार मुंबईत पेट्रोलचे दर प्रति लीटर १२०.५१ रुपये आहे. तसंच, डिझेलचे दर प्रति लीटर १०४.७७ रुपये आहे. रोजच्या दरवाढीमुळं आज पेट्रोलचे दर कितीनं वाढणार असा प्रश्न सर्वासामन्यांना रोज सकाळी पडतो. मात्र गुरूवारी तेल कंपन्यांनी सर्वसान्यांना दिलासा दिला आहे. गुरूवारी देशभरात पेट्रोल-डिझेलच्या किमतीत दरवाढ झाली नाही.

देशाची राजधानी दिल्लीत एक लिटर पेट्रोल १०५.४१ रुपये प्रति लिटर तर डिझेल ९६.६७ रुपये प्रतिलिटर मिळत आहे. आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोलचा दर १२०.५१ रुपये आणि डिझेलचा दर १०४.७७ रुपये प्रतिलिटर आहे. कोलकात्यात पेट्रोलची किंमत ११५.१२ रुपये आहे, तर डिझेलची किंमत ९९.८३ रुपये प्रति लीटर आहे. तसंच, चेन्नईमध्ये पेट्रोल ११०.८५ रुपये प्रति लिटर आणि डिझेल १००.९४ रुपये प्रति लिटर आहे. गेल्या वर्षी ४ नोव्हेंबरपासून या दोन्ही इंधनांच्या किमतीत कोणतीही वाढ झालेली नाही.

- Advertisement -

पाच राज्यांतील निवडणुकांमुळं मोदी सरकारनं तेल कंपन्यांना किमती वाढवण्यापासून रोखल्याचा आरोप सरकारच्या राजकीय विरोधकांनी केला. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल ११२ डॉलरवर पोहोचल्यानंतर तेल कंपन्यांनी रविवारी डिझेलच्या मोठ्या खरेदी दारांसाठी प्रति लिटर २५ रुपयांनी वाढ केली. हळूहळू किरकोळ दरात वाढ केली जाईल, असे तेल विक्रेत्यांचं म्हणणं आहे.

‘या’ राज्यांत पेट्रोलचे दर शंभरी पार

- Advertisement -

मध्य प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, ओडिशा, जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये पेट्रोलची किंमत 100 रुपये आहे. मुंबईत पेट्रोलचे दर सर्वाधिक आहेत.

असे पाहा आपल्या शहरातील पेट्रोलचे दर

इंडियन ऑईलचं IndianOil ONE Mobile App तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता. इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) सोप्या पद्धतीने पाहता येतील.

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती (Petrol Diesel Price) एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल.


हेही वाचा – कोणाच्याही डोळ्यात डोळे घालून उत्तर देऊ शकतो, संजय राऊतांना अमित शाहांचे प्रत्युत्तर

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -