घरताज्या घडामोडीटूलकिट : काँग्रेसचे दिल्ली CP ला पत्र, जेपी नड्डा, संबित पात्रा, स्मृती...

टूलकिट : काँग्रेसचे दिल्ली CP ला पत्र, जेपी नड्डा, संबित पात्रा, स्मृती ईराणींवर FIR ची मागणी

Subscribe

एआयसीसी रिसर्च डिपार्टमेंटच्या नावाने खोटे दस्तावेज तयार करुन तसेच खोटे टूलकिट तयार करुन अफवा पसरवण्यात येत आहे.

कोरोना संकटात देशाची स्थिती चिंताजनक झाली आहे. केंद्र सरकार कोरोना परिस्थिती हाताळण्यात अपयशी झाल्यामुळे काँग्रेसवर खोटे आरोप केले जात असल्याचा खुलासा काही काँग्रेस नेत्यांनी केला आहे. भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी पत्रकार परिषद घेऊन काँग्रेस टूलकिटच्या सहाय्याने भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना बदनाम करत असल्याचा आरोप केला. काँग्रेसने या आरोपांविरोधात दिल्ली पोलीस आयुक्तांना पत्र लिहिले आहे. या पत्रात भाजप अध्यक्ष संबित पात्रा, संबित पात्रा आणि केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्याची मागणी केली आहे.

काँग्रेसने दिल्ली पोलीस आयुक्तांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, कोरोना परिस्थितीत अपयश लपवण्यासाठी आणि काँग्रेसला बदनाम करण्यासाठी भाजपने देशात अशांतता पसरवण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी आणि संबित पात्रा व बी.एल.संतोष यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात यावे अशी मागणी काँग्रेसने पत्रातून केली आहे.

- Advertisement -

भाजपकडून दिशाभूल करण्याचा प्रयत्न

काँग्रेसने पत्रात म्हटलंय भाजपकडून सोशल मीडियाच्या माध्यमातून दिशाभूल करण्यात येत आहे. खोटी माहिती पसरवून अपप्रचार सुरु आहे. देशात खोटी अफवा पसरवून नागरिकांची दिशाभूल करण्यात येत आहे. भाजप प्रवक्ते संबित पात्रा आणि भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांच्या सांगण्यानुसार खोट्या लेटरहेडवर चुकीची माहिती टाकून आरोप करण्यात आले आहेत. देशातील कोरोना परिस्थिती हाताळण्यात आलेल्या अपयशाला झाकण्यासाठी भाजप काँग्रेसवर आरोप लावत आहेत. एआयसीसी रिसर्च डिपार्टमेंटच्या नावाने खोटे दस्तावेज तयार करुन तसेच खोटे टूलकिट तयार करुन अफवा पसरवण्यात येत आहे. यामुळे भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा, भाजप प्रवक्ते संबित पात्रा आणि केंद्रीय मंत्री व भाजप नेत्या स्मृती ईराणी यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात यावी अशी मागणी दिल्ली पोलीस आयुक्तांकडे करण्यात आली आहे.

काँग्रेस नेते राजीव गौडा यांनी फेटाळला आरोप

भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी काँग्रेसवर गंभीर आरोप केलाय या आरोपांवर काँग्रेसकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. काँग्रेसचे नेते राजीव गौडा यांनी भाजप अध्यक्ष जेपी नड्डा आणि प्रवक्ते संबित पात्रा यांच्याविरोधात एफआयआर दाखल करणार असल्याचे सांगितले आहे. काँग्रेस नेते राजीव गौडा यांनी म्हटले आहे की, भाजपला कोरोना परिस्थिती हाताळण्यात अपयश आले आहे. त्यामुळे हे अपयश झाकण्यासाठी भाजप टूलकिटचा खोटा अपप्रचार करत काँग्रेसवर आरोप करत आहे. यामुळे आम्ही भाजप अध्यक्ष जेपी नड्डा आणि संबित पात्रा यांच्या विरोधात एफआयआर दाखल करणार आहोत. देशात कोरोना परिस्थिती चिंताजनक आहे. या संकटात लोकांना मदत करण्याचे सोडून भाजप अफवा पसरवत आहे. अशे ट्विट काँग्रेस नेते राजीव गौडा यांनी केले आहे.

- Advertisement -

संबित पात्रांचा काँग्रेसवर आरोप

भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. यावेळी त्यांनी एका टूलकिटचा उल्लेख केला आहे. या टूलकिटचा वापर करुन काँग्रेस भाजप आणि पंतप्रधान मोदींना बदनाम करण्याचा कट रचत असल्याचा आरोप संबित पात्रा यांनी केला आहे. संबित पात्रा यांनी म्हटले आहे की, काँग्रेस कोरोनाच्या इंडियन स्ट्रेनला मोदी स्ट्रेन म्हणून उल्लेख करत आहे. तसेच कुंभमेळा कोरोनाचा सुपरस्प्रेडर असल्याचे सांगायचे आहे. यासाठी काँग्रेसच्या काही नेत्यांना प्रचार करण्यास सांगितलंय असा आरोप संबित पात्रा यांनी केला आहे.

दरम्यान संबित पात्रा यांनी पुढे म्हटले आहे की, काँग्रेस नेते राहुल गांधी रोज सकाळी ट्विट करतात तो टूलकिटचा भाग आहे. ज्या प्रकारे मोदी सरकारला बदनाम करण्यात येत आहे. यामध्ये जाणूनबुजून कुंभ मेळ्याचा उल्लेख केला जात आहे. परंतु बकरी ईदवर त्यांनी मौन धारण केले आहे. कोरोना संकटाशी सामना करत असताना काँग्रेस आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. राहुल गांधींच्या नेतृत्वात काँग्रेसकडून भाजपवर आरोप करण्यात येत असून मोदी सरकार कोरोना परिस्थिती हाताळण्यात अपयशी झाल्याचे सांगण्यात येत आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -