घरमुंबईCyclone Tauktae: चक्रीवादळामुळे गेट वे ऑफ इंडिया येथील जेट्टीवॉलचे मोठे नुकसान

Cyclone Tauktae: चक्रीवादळामुळे गेट वे ऑफ इंडिया येथील जेट्टीवॉलचे मोठे नुकसान

Subscribe

चक्रीवादळानंतर मुंबईत कुठे-कुठे किती प्रमाणात नुकसान झाले याची घटनास्थळी भेट देऊन महापौरांनी मंगळवारी पाहणी केली.

तौत्के चक्रीवादळामुळे (Cyclone Tauktae) गेट वे ऑफ इंडिया येथील जेट्टीवॉलचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, अशी माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे. सोमवारी तौत्के चक्रीवादळाच्या तडाख्याने जोरदार पाऊस झाल्याने मुंबईतील अनेक भागांमध्ये मोठी हानी झाली. चक्रीवादळानंतर मुंबईत कुठे-कुठे किती प्रमाणात नुकसान झाले याची घटनास्थळी भेट देऊन महापौरांनी मंगळवारी पाहणी केली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना गेट वे ऑफ इंडिया येथील जेट्टीवॉलचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याची माहिती दिली.

मोठ्या प्रमाणात नुकसान

मुंबईचे प्रवेशद्वार असलेल्या गेट वे ऑफ इंडिया या पुरातन वास्तूच्या जेट्टीवॉलचे तौत्के चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दहा माणसांनाही उचलता येणार नाही इतक्या प्रचंड मोठ्या वजनाचे दोन बेसॉल्ट दगड तुटून दूरपर्यंत फेकले गेले आहेत. यावरून वादळाची तीव्रता व झालेल्या नुकसानीची आपल्याला कल्पना येते, असे महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या. तसेच समुद्रातून मोठ्या प्रमाणात कचरा व गाळ वाहून आला आहे.

- Advertisement -

तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश

या पुरातन वास्तूच्या झालेल्या नुकसानीबाबत महापौरांनी आढावा घेतला व तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश प्रशासनाला दिले. नुकसानग्रस्त जेट्टीच्या भिंतीबाबत मुंबई पोर्ट ट्रस्टने ऑडिट करून दुरुस्ती करावी, जेणेकरून भविष्यकाळात मोठे संकट उद्भवणार नाही, असेही महापौरांनी सांगितले. याप्रसंगी ए विभागाच्या सहाय्यक आयुक्त चंदा जाधव, पालिका पुरातन वास्तू जतन समितीचे संजय सावंत आणि संबंधित पालिका अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -