घरदेश-विदेशपुलवामात आयईडीचा स्फोट; दोन जवान शहीद

पुलवामात आयईडीचा स्फोट; दोन जवान शहीद

Subscribe

जम्मू - काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात आयईडीचा स्फोट करण्यात आला होता. या स्फोटामध्ये जखमी झालेले दोन जवान शहीद झाले आहेत.

जम्मू–काश्मीरच्या सीमा भागामध्ये दहशतवाद्यांच्या खुरापती सुरुच आहेत. गेल्या काही दिवसांपासून भारत – पाकिस्तानमध्ये युद्ध सुरु असून तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. या वाढत्या तणावामुळे जम्मूतील अनेक ठिकाणी पाकिस्तानकडून सतत शस्त्रसंधीचे उल्लंघन होत आहे. अनेक ठिकाणी पाकिस्तानकडून सतत गोळीबार सुरु असताना सोमवारी करण्यात आलेल्या आयईडीच्या स्फोटामध्ये नऊ जवान जखमी झाले होते. या जखमींवर उपचार सुरु असून उपचारा दरम्यान आज, मंगळवारी दोन जवान शहीद झाले आहेत.

- Advertisement -

आयईडीचा स्फोट

जम्मू काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात आयईडीचा स्फोट करण्यात आला होता. हा स्फोट सोमवारी सकाळी करण्यात आला असून या स्फोटामध्ये नऊ जवान जखमी झाले होते. त्यातील दोन जवानांची प्रकृत्ती चिंताग्रस्त होती. या दोन जवान आज सकाळी शहीद झाल्याची माहिती समोर आली आहे. जैशमोहम्मद या दहशतवादी संघटनेकडून १४ फेब्रुवारी रोजी पुलवामा जिल्ह्यात भ्याड हल्ला करण्यात आला होता. हा हल्ला ज्या ठिकाणी करण्यात आला होता. त्या ठिकाणापासून २७ किलोमीटरवर सोमवारी आयईडीचा स्फोट करण्यात आला आहे.


हेही वाचा – काश्मीरच्या अनंतनागमध्ये चकमक; दोन अतिरेक्यांचा खात्मा

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -