घरदेश-विदेश'नागमंदिर' जे वर्षातून एकदाच उघडते

‘नागमंदिर’ जे वर्षातून एकदाच उघडते

Subscribe

वर्षातून केवळ एका दिवसासाठी उलडगणारे हे 'नागचंद्रेश्वर' मंदिर पर्यटकांसाठी आकर्षण केंद्र बनले आहे.

आज देशभरात नागपंचमीचा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला. देशातल्या विविध राज्यांमध्ये तिथल्या परंपरेनुसार आणि थोड्याफार वेगळ्या पद्धतीनुसार नागपंचमीचा सण साजरा केला जातो. आपल्या देशात असं एक नागमंदिर आहे जे फक्त वर्षातून एकदाच उघडतं. हे मंदिर आहे उज्जैन मधलं ‘नागचंद्रेश्वर मंदिर’. मध्यप्रदेशातील उज्जैनमध्ये ‘महाकालेश्वर’ हे प्रसिद्ध देवस्थान आहे. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या महाकालेश्वर मंदिराच्या वरच्या मजल्यावर असलेलं हे ‘नागचंद्रेश्वर मंदिर’ वर्षातून केवळ एकदा अर्थात नागपंचमीच्या दिवशीच भाविकांसाठी खुलं केलं जातं. या मंदिरात पंचमुखी नागेश्वराच्या मूर्तीसोबतच शंकर-पार्वतीचीही मूर्ती आहे.

नागचंद्रेश्वर मंदिर

नागपंचमीच्या दिवशी पहाटे हे मंदिर उघडलं जातं आणि दिवस मावळला की मंदिराचे दरवाजे बंद होतात ते थेट पुढच्यावर्षी उघडण्यासाठी. या एका दिवसाच्या कालावधीदरम्यान मंदिरात नागदेवतेची विशेष पूजा आणि अभिषेक केला जातो. यावर्षी मंदिरामध्ये उज्जैनचे जिल्हाधिकारी आणि महाकालेश्वर मंदिर प्रबंध समितीचे अध्यक्ष- मनीष सिंह यांनी नागचंद्रेश्वराची पूजा केली. वर्षातून केवळ एका दिवसासाठी उलडगणारे हे ‘नागचंद्रेश्वर’ मंदिर पर्यटकांसाठी आकर्षण केंद्र बनले आहे. देशभरातील हजारो भाविक दरवर्षी या मंदिरामध्ये दर्शनासाठी येतात.

- Advertisement -
nagchandreshwar temple
फोटो सौजन्य- khabarindiatv

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -