घरदेश-विदेशअबब! ध्वजारोहण करताना शहांच्या हातून निसटला तिरंगा, सोशल मीडियावर ट्रोल

अबब! ध्वजारोहण करताना शहांच्या हातून निसटला तिरंगा, सोशल मीडियावर ट्रोल

Subscribe

आज स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहणाच्या कार्यक्रमावेळी भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांच्या हातून तिरंगा निसटला. यामुळे भाजपला ट्रोल करण्याची आयती संधी मिळालेल्या विरोधकांनी अमित शहांना सोशल मीडियावर ट्रोल करण्यास सुरूवात केली आहे.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहांकडून ध्वजारोहणादरम्यान देशाचा तिरंगा खाली पडला. त्यामुळे अमित शहा ट्रोल होऊ लागले आहेत. अनेकांनी याबाबत सोशल मीडियावर प्रतिक्रिया देताना अमित शहांनी स्वातंत्र्यदिनी तिरंग्याचा अपमान केला असल्याचे म्हटले आहे. याच संधीचा फायदा घेत काँग्रेसने या घटनेचा व्हिडिओ शेअर करत अमित शहांसह भाजपाला चपराक लगावली आहे. दूरदर्शनने हा व्हिडिओ सुरुवातीला शेअर केला होता. परंतु अमित शहांना सोशल मीडियावर ट्रोल केल्यानंतर दूरदर्शनने हा व्हिडिओ डिलीट केला. यामुळे अमित शहा सध्या ट्रोल होत आहेत.

काँग्रेसची भूमिका काय

अमित शहांकडून झेंडा पडल्यानंतर काँग्रेसने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर या घटनेचा व्हिडिओ शेअर केला. त्यावर खोचक अशी प्रतिक्रियादेखील दिली आहे. काँग्रेसने म्हटलं आहे की, ‘जे लोक देशाचा राष्ट्रध्वज सांभाळू शकत नाहीत, ते लोक देश काय सांभाळणार? ५० वर्षांपेक्षा जास्त काळ देशाच्या तिरंग्याचा अपमान केला नसता तर आज तिरंग्याचा त्यांच्याकडून अपमान नसता झाला. इतरांना देशभक्तीचे प्रमाणपत्र देणाऱ्यांना राष्ट्रगीताचे नियमदेखील माहीत नाहीत’.

- Advertisement -

केजरीवालांनीदेखील केली टिका

दुसऱ्या बाजूला भाजपवर टिका करण्याची आयती चालून आलेली संधी आम आदमी पार्टीचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनीदेखील सोडली नाही. या घटनेचा व्हिडिओ केजरीवाल यांनी स्वतःच्या ट्विटर हँडलवर शेअर करत म्हटले आहे की, ‘निसर्गाचा नियम आहे की, एखादी व्यक्ती कितीही शक्तीशाही झाली तरी निसर्गासमोर तो लहानच असतो. तिरंग्याने अमित शहा यांच्या हातून फडकण्याचे नाकारले. या तिरंग्याच्या माध्यमातून भारतमाता आपल्याला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. भारतमाता आपल्याला सांगतेय की ती दुःखी आहे. दूसऱ्या बाजूला सोशल मीडियावर हजारो लोकांनी हा व्हिडिओ शेअर करत अमित शहा यांना ट्रोट केले आहे.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -