घरदेश-विदेशजॉन्सननंतर युनिलिव्हर कंपनी वादात; TRESemme शाम्पूमुळे होतोय कॅन्सर

जॉन्सननंतर युनिलिव्हर कंपनी वादात; TRESemme शाम्पूमुळे होतोय कॅन्सर

Subscribe

हिंदुस्थान युनिलिव्हरची मूळ जगप्रसिद्ध कंपनी युनिलिव्हर आता वादात सापडली आहे. या कंपनीच्या शाम्पूच्या उत्पादनांपासून कॅन्सरचा धोका असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या शॅम्पू ब्रँड्समध्ये कॅन्सरला आमंत्रित करणारे रसायन सापडले आहे. यामुळे कंपनीने शाम्पूचे अनेक प्रकार अमेरिकन बाजारपेठतून काढून टाकले आहेत. जॉन्सन अँड जॉन्सननंतर अशाप्रकारे अडचणीत सापडलेली ही दुसरी अमेरिकन कंपनी आहे.

भारतासह जगभरात युनिलिव्हर कंपनीचे उत्पादने वापरली जातात. यात विशेषत: Dove, TRESemme हे शाम्पू मोठ्याप्रमाणात वापरले जातात. मात्र कंपनीने Dove, TRESemme एअरसोल ड्राय शाम्पूसह Nexxus, Suave, TIGI हे प्रोडक्ट मागे घेतले आहेत. एका वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, या शाम्पूमध्ये बेंझीन हे कॅन्सरला आमंत्रिण देणारे रसायन सापडले आहे. अमेरिकेच्या फूड अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशननुसार, ही उत्पादने ऑक्टोबर 2021 च्या पूर्वी बनविण्यात आली होती. ही उत्पादने अमेरिकेतील प्रत्येक दुकानात वितरित करण्यात आली होती.

- Advertisement -

Dove आणि TRESemme शाम्पू भारतातही मोठ्याप्रमाणात विकले जातात. यामध्ये Dove Dry Shampoo Volume and Fullness, Dove Dry Shampoo Fresh Coconut, Nexxus Dry Shampoo Refreshing Mist आणि Suave Professionals Dry Shampoo Refresh and Revive या शाम्पूंचा समावेश आहे. बेंझिन रसायनामुळे मानवास कर्करोग होऊ शकतो. बेंझिन हे रसायन श्वसनातून, तोंडावाटे किंवा त्वचेवाटे शरीरात प्रवेश करू शकतो. यामुळे ल्युकेमिया आणि ब्लड कॅन्सर होण्याचा धोका आहे. यामुळे लोकांनी अशा प्रकराच्या उत्पादनांचा वापर थांबवला पाहिजे आणि प्रोडक्टचे पैसे परत मिळवण्यासाठी UnileverRecall.com या वेबसाईटवर दावा करावा असे एफडीएने म्हटले आहे. मात्र याबाबत अद्याप युनिलिव्हरकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

दरम्यान काही दिवसांपूर्वी लोरिअल या सुप्रसिद्ध ब्रँडच्या शाम्पूमुळे कॅन्सर होत असल्याची माहिती समोर आली आहे. एका जेनी मिशेल नावाच्या महिलेने लॉरिअल कंपनीविरोधात आरोप केली की, ती दोन दशकांहून अधिक काळ लॉरिअलचे उत्पादन वापरत होती. अशात तिला गर्भाशयाचा कॅन्सर झाला, ज्यामुळे तिला शस्त्रक्रिया करून गर्भाशय काढावं लागलं. लोरिअलच्या वापरामुळे तिला कॅन्सर झाल्याचा आरोप संबंधित महिलेने केला आहे.

- Advertisement -

इतकेच नाही तर महिलेने लोरिअल कंपनीविरोधात अमेरिकेच्या शिकागो कोर्टात याचिका दाखल केली आहे. तसेच कंपनीकडून नुकसान भरपाईची मागणी केली आहे. मात्र या याचिकेवर अद्याप कंपनीकडून कोणतीही प्रतिक्रिा आलेली नाही, आपण कोर्टात याचिका दाखल केल्यानंतर यावर काय निर्णय होईल याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.


सोशल मीडियाच्या माध्यमातून सरकारची कामे जनतेपर्यंत पोहोचवणार, दीपक केसरकरांचं मोठं वक्तव्य


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -