घरअर्थजगतUnion budget 2023 : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या लाल टेंपल साडीचे 'हे' आहे वैशिष्ट्य

Union budget 2023 : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या लाल टेंपल साडीचे ‘हे’ आहे वैशिष्ट्य

Subscribe

आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन केंद्रीय बजेट सादर करणार आहेत. यासाठी त्या संसदेत पोहोचल्या असून आज सकाळी 11 वाजता संसदेत अर्थसंकल्पीय भाषण करतील. मात्र दरवर्षीप्रमाणे यंदाही अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी त्यांच्या साडीची विशेष चर्चा रंगतेय, त्यांनी आज परिधान केलेल्या लाल साडीने सर्वांच लक्ष वेधून घेतलं आहे. निर्मला सीतारामन यांनी पारंपरिक टेंपल बॉर्डर असलेली भडक लाल रंगाची साडी नेसली आहे. या साडीला काळ्या रंगाची बॉर्डर आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, निर्मला सीतारामन यांनी टेंपल साडी परिधान केली आहे. या साडीला संबलपुरी सिल्क साडीदेखील म्हणतात. ओरिसा राज्याशी या साडीचं खास नातं आहे.

- Advertisement -

म्हणून घातली निर्मला सीतारमण यांनी लाल साडी
निर्मला सीतारामन यांना पारंपारिक, क्लासी हँडलूम आणि सिल्क साड्यांची खूप आवड आहे. त्यामुळे त्यांनी आजच्या अधिवेशनात लाल आणि काळी बॉर्डर असलेली साडली नेसली आहे आणि त्यावर बांगड्या, कानातले असा साधा लूक त्यांनी केला आहे. दरम्यान, लाल रंगाला प्रेम, ऊर्जा, शक्ती यांचे प्रतीक मानले जाते. हिंदू संस्कृतीमध्ये, लाल रंगाला नेहमी दुर्गा देवीशी जोडले जाते. जो नारी शक्ति आणि ऊर्जेचे प्रतीक आहे. त्यामुळे मंदावलेल्या अर्थवस्थेला ऊर्जा आणि ताकद देण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लाल रंगाची साडी नेसल्याचे म्हटले जात आहे.

 

- Advertisement -

हेही वाचा :

union budget 2023 : प्राप्तिकराचा स्लॅब वाढणार का? नोकरदारांचे अर्थसंकल्पाकडे लक्ष

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -