घरताज्या घडामोडीCDS Bipin Rawat Death : तिन्ही सेवेच्या प्रमुखांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी सीडीएस...

CDS Bipin Rawat Death : तिन्ही सेवेच्या प्रमुखांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी सीडीएस रावत आणि सुरक्षा जवानांना वाहणार श्रद्धांजली

Subscribe

तामिळनाडूतील कुन्नूर येथे लष्करी हेलिकॉप्टर कोसळून अपघात झालेल्या सीडीएस जनरल बीपीन रावत आणि त्यांच्या पत्नीसह १३ जणांचा काल (बुधवार) मृत्यू झाला. या दुर्देवी घटनेनंतर सर्वच स्तरांतून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. तसेच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील सीडीएस बिपीन रावत यांना श्रद्धांजली वाहिली आहे. परंतु आज संध्याकाळी नऊ वाजता दिवंगत सीडीएस बिपीन रावत आणि सुरक्षा दलातील इतर जवानांना आदरांजली वाहणार आहेत.

पीएम नरेंद्र मोदी यांच्यासमवेत संरक्षण मंत्री, संरक्षण राज्यमंत्री ,राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि तीन सेवेचे प्रमुखही उपस्थित राहून दिवंगत सीडीएस बिपीन रावत आणि सुरक्षा दलातील इतर जवानांना श्रद्धांजली वाहणार आहेत.

- Advertisement -

या अपघातामध्ये वायुसेनेचे एक अधिकारी बचावले असून ते गंभीर जखमी आहेत. वेलिंग्टन येथील लष्कराच्या रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. काल केलेल्या ट्विट पीएम मोदींनी असं म्हटलंय की, सीडीएस जनरल बिपीन रावत हे एक अतुलनीय सैनिक होते. एक सच्चा देशभक्त. देशाचं लष्कर आणि सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्यासाठी त्यांचा मोलाचा वाटा होता. धोरणात्मक बाबींवर त्यांची मत आणि दृष्टीकोन फार महत्त्वाचे असायचे. ओम शांती असं म्हणत पीएम मोदींनी बिपीन रावत यांच्यासोबतचा एक फोटो शेअर केला आहे.

- Advertisement -

कुन्नूर येथे झालेल्या दुर्घटनाग्रस्त भागात भारतीय वायु सेनाच्या एम-१७ हेलिकॉप्टरचा डेटा रेकॉर्डर आज सकाळी सापडला. डेटा रेकॉर्डर हे ब्लॅक बॉक्सचं एक फंक्शन आहे. या ब्लॅक बॉक्समध्ये हेलिकॉप्टरची अंतिम स्थिती आणि इतर काही माहिती यामधून मिळते. एखाद्या अपघाताच्या कारणांचा शोध लावण्यासाठी हे उपकरणं महत्त्वाचं असते. फोरेन्सिक तपासातून हेलीकॉप्टर दुर्घटनेविषयी माहिती मिळू शकते.

दरम्यान, सीडीएस बिपीन रावत यांचे पार्थिव दिल्लीत शुक्रवारी सकाळी ११ ते २ वाजेपर्यंत त्यांच्या घरी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. यानंतर कामराज मार्ग ते बरार चौकापर्यंत अंत्ययात्रा काढण्यात येणार आहे. तसेच दिल्लीतील कॅन्टोनमेंटमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.


हेही वाचा: CDS Bipin Rawat: बिपीन रावत थिएटर कमांडवर करत होते काम


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -