घरदेश-विदेशराज्यसभा निवडणुकीपूर्वी BSP मध्ये बंडखोरी; रामजी गौतमच्या ५ सदस्यांची माघार

राज्यसभा निवडणुकीपूर्वी BSP मध्ये बंडखोरी; रामजी गौतमच्या ५ सदस्यांची माघार

Subscribe

उत्तर प्रदेशमध्ये नोव्हेंबरच्या महिन्यात होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीच्या आधीच बहुजन समाज पार्टीला मोठा धक्का देण्यात आला आहे. बुधवारी बसपाच्या वतीने उभे राहणारे उमेदवार रामजी गौतम यांच्या १० सदस्यांपैकी ५ जणांनी आपला अर्ज माघारी घेतला आहे. अशात आता रामजी गौतम यांची उमेदवारी अडचणीत आली आहे. या पाच सदस्यांनी आज, बुधवारी सकाळी समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांची भेट घेतली होती. त्यानंतर आता बसपामध्ये नाराजीचे सूर उमटत आहेत. बसपाचे पाच आमदार बुधवारी सकाळी अचानक विधानसभेत आपला अर्ज परत घेण्यासाठी दाखल झाले.

बसपाचे असलम चौधरी, असलम राईनी, मुज्तबा सिद्दिकी, हाकम लाल बिंद, गोविंद जाटव यांनी आज अर्ज माघारी घेतले आहेत. दरम्यान, कालच असलम चौधरी यांच्या पत्नीने समाजवादी पार्टीचे सदस्यत्व स्विकारले होते. उत्तर प्रदेशात दहा राज्यसभेच्या जागांसाठी निवडणूका होणार आहेत. यासाठी १० उमेदवार मैदानात उतरले आहेत. भाजपच्या वतीने आठ तर सपाच्या वतीने एक आणि बसपा व अपक्ष असे एक-एक उमेदवार निवडणूक लढवत आहेत. राज्यात ९ नोव्हेंबरमध्ये राज्यसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. या मतदानाचे निकाल ११ नोव्हेंब रोजी जाहीर होतील. तसेच ही जागा २५ नोव्हेंबरला रिक्त होणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा –

‘तुझ करिअर कसं होतं तेच बघतो..’‘Bigg Boss’ स्पर्धकाला मनसेचा इशारा!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -