घरमुंबईकंगना VS बीएमसी या वादात पालिकेला ८२ लाखांचा भुर्दंड; अभिनेत्रीचे पालिकेवर ताशेरे

कंगना VS बीएमसी या वादात पालिकेला ८२ लाखांचा भुर्दंड; अभिनेत्रीचे पालिकेवर ताशेरे

Subscribe

कंगना विरुद्ध मुंबई महापालिका लढाईत अस्पी चिनॉय यांना किती रक्कम देण्यात आली,याबाबत ही माहिती मागवली होती. त्यात ८२ लाख ५० हजार खर्च झाल्याचे समोर आले आहे.

गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत आणि मुंबई महापालिका यांच्यात वाद सुरूच आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी केलेल्या वक्तव्यापासून ते कंगनाचं ऑफिसच्या तोड-फोडी प्रकरणी कंगना सतत चर्चेत आहे. दरम्यान कंगनाविरोधातील खटला लढण्यासाठी BMC ने ८२ लाख ५० हजार खर्च केले असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे कंगना VS बीएमसी या वादात पालिकेला ८२ लाख ५० हजारांता भुर्दंड सोसावा लागाला असल्याचे सांगितले जात आहे.

शरद यादव यांनी विधि खात्याकडे माहितीचा अधिकार कायद्याअंतर्गत याबाबत माहिती मागितली होती. कंगना विरुद्ध मुंबई महापालिका लढाईत अस्पी चिनॉय यांना किती रक्कम देण्यात आली,याबाबत ही माहिती मागवली होती. त्यात ८२ लाख ५० हजार खर्च झाल्याचे समोर आले आहे.

- Advertisement -

कंगनाचे कार्यालय तोडण्याचे प्रकरण न्यायालयात

मुंबई महापालिकेने कंगनाचे पाली हिल याठिकाणचे कार्यालय तोडण्याचे प्रकरण न्यायालयात गेले आहे. त्यानंतर पालिकेने ‘एच-पश्चिम’ विभाग कार्यालयाने पाली हिल याठिकाणी कंगना रणौतच्या कार्यालयात अनधिकृत बांधकाम असल्याचा आरोप करत हातोडा चालवला. याप्रकरणी कंगनाने कोर्टात धाव घेतली आहे. याकरता पालिकेची बाजू ज्येष्ठ वकील, वरिष्ठ अधिवक्ता अस्पी चिनॉय मांडत आहेत. या लढ्यासाठी पालिकेने आतापर्यंत ८२ लाख ५० हजार खर्च केले आहेत. चिनॉय यांनी आतापर्यंत ११ वेळा पालिकेची बाजू मांडली आहे. प्रत्येक तारखेसाठी त्यांनी आकारलेल्या ७  लाख ५० हजार शुल्कानुसार पालिकेला इतकी रक्कम मोजावी लागली आहे.

- Advertisement -

अभिनेत्रीचे पालिकेवर ताशेरे

दरम्यान अभिनेत्री कंगना रणौत हिने देखील पालिकेच्या या खर्चावरून बीएमसीवर ताशेरे ओढले आहेत. तिने असे म्हटले आहे की, ‘माझे घर बेकायदेशीरपणे तोडण्यासाठी महापालिकेने आतापर्यंत ८२ लाख खर्च केले आहेत. एका मुलीला त्रास देण्यासाठी पप्पू एवढे पैसे खर्च करत आहेत. आज अशाठिकाणी महाराष्ट्र आहे, हे दुर्भाग्यपूर्ण आहे.’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -