घरमुंबई‘तुझ करिअर कसं होतं तेच बघतो..’‘Bigg Boss’ स्पर्धकाला मनसेचा इशारा!

‘तुझ करिअर कसं होतं तेच बघतो..’‘Bigg Boss’ स्पर्धकाला मनसेचा इशारा!

Subscribe

मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी जानच्या मराठी भाषेबद्दल मानहानीकारक वक्तव्यानंतर त्याचा चांगलाच समाचार घेतला आहे.

कलर्स वाहिनीवर सुरु असलेल्या बिग बॉस रिअॅलिटी शोमध्ये प्रसिद्ध गायक कुमार सानूचा मुलगा जानकुमार सानूनं मराठी भाषेबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने मराठी भाषाप्रेमींकडून संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, ‘बिग बॉस’च्या १४ व्या पर्वात स्पर्धक गायक राहुल वैद्य, जान कुमार सानू आणि निक्की तंबोली यांच्यात चांगलीच खडाजंगी पहायला मिळाली आहे. या वादादरम्यान जान कुमार सानूने मराठी गायक राहुल वैद्य याच्यावर शाब्दिक हल्लाबोल करताना ‘मराठी’ भाषेबद्दल अपमानकारक शब्द उच्चारले. यानंतर आता मनसेच्या अमेय खोपकरांनी जान कुमार सानूला धमकीवजा इशारा दिला आहे.

बिग बॉसच्या घरातील खेळादरम्यान झालेल्या वादात जान कुमार सानूने निक्की तंबोलीशी बोलताना मराठी भाषेची चीड येत असल्याचे म्हटले आहे. यावरच मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी ट्वीट केले आहे. ते म्हणाले, जान कुमार सानू… मराठी भाषेची याला चीड येते म्हणे. अरे तू कीड आहेस मोठी… मुंबईतून हाकलून देण्यासाठी याला मी नॉमिनेट करतोय…

- Advertisement -

तर दुसऱ्या ट्वीटमध्ये मुंबईत राहून तर आता तुझं करिअर कसं बनतं जान सानू तेच बघतो, असा इशाराही त्यांनी दिला आहे. ते म्हणाले, लवकरच तुला स्वत:ची चीड येईल ही माझी गॅरंटी. तुला थोबडवनार लवकरच आता आम्ही मराठी. कलर्ससारख्या वाहिनीने खरंतर हा सीन वगळायला हवा होता, पण एडिट केलं नाही ते बरं झालं, गद्दारांची तोंडं कशी असतात ते समजले, असं देखील खोपकर यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

‘बिग बॉस’मधून हाकला, अन्यथा कार्यक्रम चालू देणार नाही!

यासह शिवसेना नेते, आमदार प्रताप सरनाईक यांनी देखील आता जानला या स्पर्धेतून वगळण्यात यावे, अशी मागणी केली आहे. तर अत्यंत चुकीच्या पद्धतीने आरडा ओरडा करून जान कुमार सानूने मराठी भाषेचा अवमान केला आहे. त्या बद्दल कलर्स वाहिनीने जर, मुजोर जान कुमार सानू याची मालिकेतून हकालपट्टी केली नाही, तर सेटवर येऊन शिवसेना आपल्या पद्धतीने आंदोलन करेल, असा इशारा शिवसेना प्रवक्ते आमदार प्रताप सरनाईक यांनी कलर्स वाहिनीला दिला आहे.

‘बिग बॉस’ या कार्यक्रमाला प्रामुख्याने महाराष्ट्रीतील प्रेक्षकांच्या प्रचंड पसंतीमुळे टीआरपी मिळतो, त्याचे चित्रीकरणही महाराष्ट्रातच होते आणि त्याच महाराष्ट्राच्या मराठी भाषेचा अवमान, त्या मालिकेतला कोणीतरी टिनपाट जान कुमार सानू नावाचा स्पर्धक करत असेल तर, ते कदापि खपवून घेणार नाही, असा कडक इशाराही प्रताप सरनाईकांनी दिला आहे.


देशात २४ तासात ४३,८९३ नवे कोरोना रूग्ण; बाधितांचा एकूण आकडा ८० लाखांच्या उंबरठ्यावर!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -