घरदेश-विदेशअपघातांमुळे 'वंदे भारत एक्सप्रेस' ९५ मिनिटे उशीरा

अपघातांमुळे ‘वंदे भारत एक्सप्रेस’ ९५ मिनिटे उशीरा

Subscribe

वारानसीहून नवी दिल्लीला परततांना वंदे भारत एक्सप्रेस एका प्राण्याला आणि दुचाकीला धडकली. या अपघातामुळे नवी दिल्ली स्थानकावर ही ट्रेन ९५ मिनिटे उशीरा पोहोचली.

‘ट्रेन १८’ म्हणजेच ‘वंदे भारत एक्सप्रेस’ या सुपरफास्ट ट्रेनला ‘देशातील सर्वात वेगवान ट्रेन’ असा बहुमान प्राप्त झाला आहे. मात्र मागील काही दिवसापासून या ट्रेनवर हल्ले होत असल्याच्या घटना समोर येत आहेत. या घटनेनंतरच काल या ट्रेनचा अपघात झाल्याने  देशातील सर्वात वेगवान ट्रेनचा वेग कमी झाला आहे. ही ट्रेन वेगवान असल्याने तिच्या मार्गामध्ये येणाऱ्यांसाठी ती थांबत नाही. वारानसी ते नवी दिल्ली प्रवासादरम्यान काल या ट्रेन ने एका जनावरला धडक दिली. यानंतर काही क्षणातच एका दुचाकीलाही धडक दिली. या घटनेमुळे या ट्रेनला नवी दिल्ली येथे पोहोचण्यासाठी ९५ मिनिटे उशीर झाला.

- Advertisement -

रेल्वे प्रशासनाने दिलेल्या महितीनुसार काल रात्री ८ वाजून १८ मिनिटांनी हा उपघात झाला. सलग झालेल्या दोन अपघातांमुळे ही ट्रेन सराई भूपत येथे काही काळ थांबली होती. ट्रेनला उशीर झाल्याने प्रवाशांची गैरसोय झाली. मागील काही दिवसांपासून ट्रेनवर होणारे हल्ले आणि अपघात या कारणामुळे ट्रेन उशीरा पोहोचते आहे. मागील दोन महिन्यात चारवेळा या ट्रेनवर दगडफेक झाली होती. सर्वात वेगवान ट्रेन असल्यामुळे याचा फटका रुळावर असलेल्या लोकांना लागत असल्याचे चित्र आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -