घरदेश-विदेशTerror attack: दहशतवाद्यांना सोडणार नाही - पंतप्रधान मोदी

Terror attack: दहशतवाद्यांना सोडणार नाही – पंतप्रधान मोदी

Subscribe

देशातील सर्वात वेगवान 'ट्रेन १८' (वंदे भारत) च्या लोकार्पणावेळी पंतप्रधान मोदींनी पुलवामा हल्ल्याबद्दल आपले मत मांडले.

भारतीय जवानांवर काश्मीरच्या पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी नुकतीच केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी अर्थमंत्री अरुण जेटली, परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज, गृहमंत्री राजनाथ सिंह, संरक्षण मंत्री निर्मला सितारामण यांच्यामध्ये ही बैठक पार पडली. बैठकीनंतर मोदी ‘वंदे भारत’ या देशातील सर्वात जलद ट्रेनच्या उद्घाटनाला पोहोचले. देशातील सर्वात वेगवान ‘ट्रेन १८’ (वंदे भारत) ची पूर्वनियोजित पहिली चाचणी आज दिल्लीमधून होणार आहे. दरम्यान, याठिकाणी बोलत असताना मोदी यांना पुलवामा दहशतवादी हल्ल्याबद्दल आपले जाहीर मत मांडले. ‘पाकिस्तान’चे उघडपणे नाव न घेता मोदींनी त्यांच्यावर आसूड ओढले.

काय म्हणाले मोदी…

  • दहशतवादाला खत-पाणी घालणाऱ्यांची गय केली जाणार नाही
  • हल्ल्याचा निषेध करणाऱ्या देशवासीयांचे आभार
  • भारतवासीयांचा आक्रोश वैध आहे
  • त्यांचा मार्ग विनाशाचा आहे, भारताचा मार्ग प्रगतीचा
  • एकाही दशतवाद्याला सोडलं जाणार नाही
  • शेजारी देशांचे कपटी मनसुबे कधीच पूर्ण होणार नाहीत
  • संपूर्ण देश दहशतवाद्यांच्या विरोधात एकवटला आहे
  • केंद्र सरकार शहीद जवानांंच्या कुटुंबियांसोबत आहे
  • रक्ताच्या एक एक थेंबांची किंमत त्यांना मोजावी लागणार आहे

मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवलेल्या ‘ट्रेन १८’ या सुपरफास्ट ट्रेनला ‘देशातील सर्वात वेगवान ट्रेन’ असा बहुमान प्राप्त झाला आहे. ही भारतातील पहिली इंजिनविरहित आणि संपूर्ण स्वदेशी बनावटीची ट्रेन असून, तिला ‘वंदे भारत एक्सप्रेस’ असंही  नाव देण्यात आलं आहे. आज या ट्रेनच्या दिल्ली ते वाराणसी अशा पहिल्या फेरीला मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवण्यात आला आहे. पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमवीर अत्यंत साधेपणाने हा सोहळा पार पडणार असल्याचं मोदी यांनी आधीच जाहीर केलं होतं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -