घरताज्या घडामोडीसोनं आणि पैसे नाही तर आता कांदा लसनाची झाली चोरी!

सोनं आणि पैसे नाही तर आता कांदा लसनाची झाली चोरी!

Subscribe

बॅंक लुटल्याची किंवा घरातून पैसे किंवा सोनं लुटल्याची घटना तर आपण ऐकलीच असेल पण लखनऊमध्ये मात्र कांदा आणि लसूनची चोरी झाल्याची घटना घडलेली आहे.

कांद्याच्या वाढत्या किंमतींबद्दल आपल्याला रोज ऐकाला मिळत आहे. आपल्या रोजच्या आहारातून कांद्याला बाहेर काढावे लागत आहे इतकी या कांद्याची किंमत वाढलेली आहे. चोरांची नजर जशी सोनं चांदी सारख्या महागड्या गोष्टींवर दडलेली असते तशीच आता त्यांची नजर ही महागलेल्या कांद्यांवर देखील दडलेली आहे. कारण उत्तर प्रदेशातील लखनऊमध्ये कांदा चोरी झाल्याची घटना घडलेली आहे. आलमबाग या ठिकाणातील मवईया भाजी मार्केटमधील एका भाजी विक्रेताच्या दुकानातून चक्क १६० किलो कांदे आणि ७० किले लसणाची चोरी झालेली आहे. तर या चोरीमुळे दुकानदाराला सुमारे २८ हजार ६०० रुपयाचे नुकसान भोगावे लागले आहे.

कशी झाली चोरी?

विरेंद्र कुमार नावाचा माणूस आलमबागतील मवईया मार्केटमधील एक भाजी विक्रेता आहे. तर कुमार यांनी पोलीसांना दिलेल्या माहितीनुसार रविवारी ते रात्री ११ वाजता दुकान बंद करून आपल्या घरासाठी निघाले होते. त्या दिवशी दुकानात कांदा, लसुण आणि इतर भाज्यांचा स्टॉक होता. मात्र सोमवारी सकाळी सव्वा सहा (६:१५) वाजता जेव्हा त्यांनी आपलं दुकान उघडलं तेव्हा दुकानातील सगळ्या गोष्टी या अस्थ व्यस्थ झाल्या होत्या. सगळ्या गोष्टींवर जेव्हा कुमार यांनी नीट नजर टाकली तेव्हा त्यांना कळण्यात आलं की कांद्याच्या ३ गोण्या, लसणाच्या २ गोण्या आणि एक हजार रुपयाचे नाणे हे गायब आहेत.

- Advertisement -

तर कुमार यांनी या घटनेबद्दल तातडीने आलमबाग पोलिस स्टेशनात तक्रार नोंदवली. पोलीसांना त्यांनी सांगितल्याप्रमाणे १६० किलो कांदे आणि ७० किलो लसणाची चोरी झाली आहे. तर या गोष्टींची एकून किंमत ही सुमारे २८ हजार ६०० रुपये आहे. तर पोलीसांनी म्हंटल्याप्रमाणे त्यांनी या घटनेबद्दल चौकशी करायला सुरूवात केली आहे आणि चोराला ते लवकरात लवकर पकडतील असा दावा त्यांनी कुमार यांना दिला.


हेही वाचा: कांदे विकत घेण्यासाठी रांगेत उभा असलेल्या व्यक्तिचा मृत्यू

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -