घरमुंबईकुर्ल्यात पोलिसाला कोब्राने डसले; कॉन्स्टेबलचा जागीच मृत्यू

कुर्ल्यात पोलिसाला कोब्राने डसले; कॉन्स्टेबलचा जागीच मृत्यू

Subscribe

३.५ फूटाच्या असणाऱ्या या कोब्रा सापाने हवालदाराला चावा घेतल्यानंतर त्या हवालदाराचा मृत्यू

कुर्ला येथील नेहरू नगर पोलीस ठाण्याजवळ असणाऱ्या पोलीस क्वार्टरमध्ये राहणाऱ्या हवालदाराला सोमवारी पहाटे कोब्रा या विषारी सापाने दंश घेत चावा घेतला. ३.५ फूटाच्या असणाऱ्या या कोब्रा सापाने हवालदाराला चावा घेतल्यानंतर त्या हवालदाराचा मृत्यू झाला. वयवर्ष ३२ असणारे सुनील तुकाराम भगत हे पुण्यातील शिवाजी नगर पोलीस ठाण्यात कॉन्स्टेबल होते तर त्यांची २८ वर्षीय पत्नी समृद्धी ही देवनार पोलीस ठाण्यात कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत आहे. या दोघांना तीन वर्षाचे बाळ आहे. आपल्या परिवाराला भेटण्यासाठी भगत यांनी काही दिवस सुट्टी घेतली होती.

असा घडला प्रकार

साधारण मध्यरात्री ३ वाजेदरम्यान सुनील भगत यांची तब्येत अचानक बिघडली. अस्वस्थ वाटत असल्याची तक्रार त्यांनी आपल्या पत्नीकडे करत तिला देखील मध्यरात्री उठवले. कोब्राने दंश केल्यानंतर भगत हे बेशुद्ध झाले. त्यांचे शरीर दुखत असून त्यांना उलट्या देखील झाल्यात. यावेळी समृद्धी त्यांना पाणी देण्यासाठी स्वयंपाकघरात गेल्या होत्या. तेव्हा त्यांना सिलेंडरच्या मागच्या बाजूस कोब्रा सापाची शेपूट दिसली, असे नेहरू नगरच्या एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

- Advertisement -

अशा अवस्थेनंतर पतीला सापाने चावले असावे, असा संशय आल्यानंतर समृद्धी यांनी शेजाऱ्यांना मदतीसाठी आवाज दिला. यानंतर त्यांच्या इमारतीच्या ५० मीटरवर असणाऱ्या पोलीस ठाण्यातील कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांना देखील याची माहिती दिली. या कोब्राला पकडण्यासाठी त्यांनी त्याला स्वयंपाकघरातच बंद करण्यात आले. यानंतर सगळ्यांनी भगत यांना शीव येथील रूग्णालयात दाखल करण्यासाठी नेले. मात्र तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. भगत यांना रूग्णालयात नेताना त्यांच्या डाव्या पायावर कोब्राने दंश केल्याच्या खुणा दिसल्याचे एका पोलिसाने सांगितले.

मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाने महाराष्ट्र अ‍ॅनिमल रेस्क्यू असोसिएशनला याची माहिती दिल्यानंतर अ‍ॅनिमल रेस्क्यू असोसिएशनच्या सुनील कदम यांनी कोब्रा सापाला ताब्यात घेत त्याला आरे जंगलात सोडून देण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -