घरदेश-विदेश'डान्सिंग अंकल' आता विदिशा नगर पालिकेचे ब्रँड अँबेसेडर

‘डान्सिंग अंकल’ आता विदिशा नगर पालिकेचे ब्रँड अँबेसेडर

Subscribe

आपल्या अनोख्या डान्सच्या अंदाजाने रातोरात प्रसिद्ध झालेल्या भोपाळचे प्रोफेसर संजीव श्रीवास्तव यांना अजून एक मान मिळाला आहे. यावेळी प्रोफेसर संजीव श्रीवास्तव यांना विदिशा नगर पालिकेचे ब्रँड अँबेसेडर म्हणून घोषित करण्यात आलं आहे. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी श्रीवास्तव यांचा डान्स व्हिडिओ ट्विट करून प्रशंसा केली होती. संजीव श्रीवास्तव ऊर्फ डब्बूजी हे मध्यप्रदेशमधील विदिशाचे रहिवासी असून सध्या भोपाळमधील भाभा इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये इलेक्ट्रॉनिक्सचे सहाय्यक प्रोफेसर म्हणून कार्यरत आहेत.

डान्सर अंकलना मिळाला मानाचा तुरा

आपल्या एका नातेवाईकाच्या लग्नामध्ये संजीव श्रीवास्तव यांनी गोविंदाच्या खुदगर्ज या चित्रपटातील ‘मैं से मीना से ना साकी से’ गाण्यावर डान्स केला होता. जो प्रचंड प्रमाणात व्हायरल झाला आणि रातोरात संजीव श्रीवास्तव यांना प्रसिद्धी मिळाली. देशभरात लोकांकडून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला. यामुळेच त्यांना विदिशा नगर पालिकेने आपले ब्रँड अँबेसेडर म्हणून नियुक्त केले आहे.

- Advertisement -

शुक्रवारीच मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ट्विट करून म्हटले होते, ‘पूर्ण देश ज्यांच्या डान्समुळे दीवाना झाला आहे, ते प्रोफेसर भोपाळचे आहेत. आमच्या विदिशामधील राहणाऱ्या आणि भोपाळमध्ये काम करणाऱ्या प्रोफेसर संजीव श्रीवास्तव यांची सध्या संपूर्ण भारतात इंटरनेटवर चर्चा आहे. तुम्ही विश्वास ठेवा अथवा नका ठेऊ मध्यप्रदेशमध्ये एक खास गोष्ट तर नक्कीच आहे.’

- Advertisement -

गोविंदा चाहता, लोकांच्या प्रतिसादामुळे होतोय आनंद

संजीव श्रीवास्तव हे गोविंदाचे फॅन असून त्यांनी कॉलेजमध्ये असताना डान्स स्पर्धा जिंकल्या होत्या. ‘कुटुंबातील एका कार्यक्रमात केलेल्या डान्समुळे मी इतका प्रसिद्ध होईन, असे कधी स्वप्नातदेखील मला वाटले नव्हते. लोकांना माझा डान्स आवडत आहे आणि त्यांचे प्रेम मला मिळतं त्यामुळे मनापासून त्यांचे आभार. गोविंदा हा माझा आदर्श आहे. खूप मोठमोठी लोकं माझी प्रशंसा करत असल्याने मी आनंदी आहे.’ अशी प्रतिक्रिया त्यांनी एका वृत्तपत्राला दिली आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -