घरदेश-विदेशमध्यप्रदेशात ६० लाख बनावट मतदार, निवडणूक आयोगाचे चौकशीचे आदेश

मध्यप्रदेशात ६० लाख बनावट मतदार, निवडणूक आयोगाचे चौकशीचे आदेश

Subscribe

मध्यप्रदेशमध्ये ६० लाख बनावट मतदार आढळून आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. फेब्रुवारीमध्ये मध्यप्रदेशमध्ये विधानसभेच्या पोटनिवडणुका होणार आहेत. त्यामुळे या घटनेचे गांभीर्य वाढले आहे. दरम्यान काँग्रेसने ६० लाख ओळखपत्रांसह निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली असून, निवडणूक आयोगाने चौकशीचे आदेश दिले आहेत.

प्रकरणाचा तपास सुरू

६० लाख बनावट मतदार आढळून आल्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली आहे. संपूर्ण प्रकरणाची चौकशी व्हावी यासाठी निवडणूक आयोगाकडून ४ टीम्स नेमण्यात आल्या आहेत. या टीम्स प्रत्येक घरी जाऊन चौकशी करणार आहेत. तसेच दोषी आढळल्यास त्याविरोधात कडक कारवाई करण्यात येणार आहे. तसेच याद्यांमध्ये सुधारणा करण्याचे आदेश देखील निवडणूक आयोगाकडून देण्यात आले आहे.

- Advertisement -

काँग्रेसचा भाजपवर आरोप

याप्रकरणानंतर भाजप ‘लोकशाहीची हत्या’ करत असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कमलनाथ यांनी देखील निवडणूक आयोगाकडे यासंदर्भातले पुरावे सादर केले आहेत. तसेच हा संपूर्ण प्रकार म्हणजे ‘प्रशासनाचा गैरवापर’ असल्याचे देखील कमलनाथ यांनी म्हटले आहे. यावर बोलताना काँग्रेसचे नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी देखील शंका उपस्थित करत भाजपवर आरोप केला आहे. “मध्यप्रदेशमध्ये १० वर्षात लोकसंख्या २४ टक्क्यांनी वाढली पण, मतदारांची संख्या ४० टक्क्यांनी कशी वाढू शकते?” असा सवाल शिंदे यांनी उपस्थित केला आहे.

- Advertisement -

निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण

संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी सुरू असल्याचे निवडणूक आयोगाने सांगितले आहे. तसेच ६० लाखांपैकी ३ लाख ८६ हजार नावे ही यादीतून काढून टाकल्याची माहिती राज्य निवडणूक आयु्क्त सलिन सिन्हा यांनी दिली. दरम्यान या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू असून सरकार यामध्ये कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप करत नसल्याचे मंत्री विश्वास सारंग यांनी सांगितले.

बोगस मतदार सापडल्याच्या घटना

  1. कर्नाटकातमधल्या निवडणूक १० हजार बोगस मतदार सापडले
  2. पालघर  पोटनिवडणुकीत एका रात्रीत ८० हजार मतदार वाढले
  3. गोंदिया – भंडारामध्ये देखील बोगस मतदार सापडल्याचा आरोप

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -