घरताज्या घडामोडीवापरलेले कंडोम धुवून पुन्हा विकले जात होते; पोलिसांनी ३ लाख कंडोम जप्त...

वापरलेले कंडोम धुवून पुन्हा विकले जात होते; पोलिसांनी ३ लाख कंडोम जप्त केले

Subscribe

जगात भेसळ कशात केली जाईल, काहीच सांगता येत नाही. कोरोना असताना देखील काही महाभागांनी वापरलेले मास्क, पीपीई किट पुन्हा वापरण्याचे पाप केले आहे. आता त्याच्याही पुढे जाऊन डोक्याला झिणझिण्या आणणारे प्रकरण समोर आले आहे. दक्षिण पूर्व आशियाई देश व्हिएतनाममध्ये एक किळसवाणा प्रकार घडला आहे. व्हिएतनाम पोलिसांनी व्हिएतनामच्या दक्षिण प्रांतातील बिन्ह दुआंग (southern province of Binh Duong) येथे कंपनीवर धाड टाकली, तेव्हा त्यांना सव्वा तीन लाख वापरलेले कंडोम धुवून पुन्हा विकण्यासाठी तयार केले जात असल्याचे निदर्शनास आले. व्हिएतनाम टेलिव्हिजनने (VTV) ही बातमी दिली आहे.

व्ही टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, हे गैरकृत्य करणाऱ्या कंपनीवर छापा मारण्यात आल्यानंतर तिथे मोठमोठ्या पिशव्यांमध्ये कंडोम धुवून पॅकिंग करण्यासाठी तयार ठेवल्याचे आढळले. या सर्व पिशव्यांचे वजन ३६० किलो एवढे भरले आहे. पोलिसांनी काही लोकांना अटक केली. त्यापैकी एका पुरुषाने सांगितले की, आम्हाला काही लोक हे वापरलेले कंडोम आणून देतात. तर या कंपनीत कामाला असलेल्या एका महिलेने सांगितले की, आम्ही वापरलेल्या कंडोमना आधी उकळत्या पाण्यात टाकतो. त्यानंतर ते बाहेर काढून सुकवतो.

- Advertisement -
police seize 324000 used condoms
जप्त केलेले कंडोम

कंडोम पुन्हा वापरण्यासाठी तयार करण्याच्या प्रक्रियेबद्दल बोलताना ही महिला म्हणाली की, एकदा कंडोम सुकले की आम्ही तो लाकडाच्या लिंगावर लावून त्याला पुन्हा आकार देतो. त्यानंतर कंडोम पाकिटात बंद करुन विकण्यासाठी पाठवले जातात. मात्र आतापर्यंत किती वापरलेले कंडोम बाजारात विकण्यात आलेले आहेत. याबद्दल माहिती मिळू शकलेली नाही. या महिलेने पुढे सांगितले की, आम्ही जितके किलो कंडोम वापरण्यासाठी पुन्हा तयार करु त्याप्रमाणे आम्हाला पैसे मिळतात.

कंडोम रिसायकल करणाऱ्या या कंपनीच्या आसपासच्या लोकांनी माहिती दिली की, हे कंडोम या शहरातील हॉटेल आणि दुकानांमध्ये विकले जाते. व्हिएतनाम पोलीस आता या कंपनीच्या मालकाचा कसून शोध घेत आहे. खरंतर कंडोम हे मेडिकल कचरा या प्रकारात मोडते. मात्र लोक आपल्या स्वार्थासाठी कोणत्या थराला जातील, याचा काही नेम नाही. वापरलेले कंडोम नष्ट करण्याच्या सूचना असतानाही याप्रकारे आरोग्याशी खेळण्याचा प्रकार केला जात आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -