Corona In Maharashtra: राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या १३ लाख पार!

Maharashtra Corona Update 9000 news corona positive patient and 180 deaths in 24 hours
महाराष्ट्रातील आजची कोरोना बाधित रुग्णांची आकडेवारी

राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सातत्याने वाढत आहे. त्यामुळे राज्य सरकारने ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ यासारखी मोहीम राबवली आहे. या अंतर्गत राज्यातील कोरोना मृत्यूदर आणि रुग्णवाढीची संख्या कमी करण्याचा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी काही दिवसांपूर्वी व्यक्त केला होता. पण आज राज्यातील कोरोनाबाधितांची रुग्ण संख्येने १३ लाखांचा टप्पा ओलांडला आहे. गेल्या २४ तासांत राज्यात १७ हजार ७९४ नवे कोरोनाबाधित आढळले असून ४१६ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या १३ लाख ७७५वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ३४ हजार ७६१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकाबाजूला राज्यात रुग्णवाढ होत असून दुसऱ्या बाजूला रिकव्हरी रेट देखील वाढताना दिसत आहे.

आज दिवसभरात राज्यात १९ हजार ५९२ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत एकूण ९ लाख ९२ हजार ८०६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रिकव्हरी रेट ७६.३३ टक्के एवढा झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.६७ टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६२ लाख ८० हजार ७८८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १३ लाख ७५७ (२०.७१टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २ लाख ७२ हजार ७७५ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढील प्रमाणे..

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका १८७६ १९४३०३ ४८ ८७०६
ठाणे २५७ २८२३१ ७१६
ठाणे मनपा ४१५ ३६११३ १०७५
नवी मुंबई मनपा ४११ ३७९८० ८५८
कल्याण डोंबवली मनपा ३३९ ४४३५३ ८२७
उल्हासनगर मनपा २६ ९०५० ३०८
भिवंडी निजामपूर मनपा ३३ ५२५५ ३३२
मीरा भाईंदर मनपा १८२ १८२१० ५४९
पालघर १४७ १२८४५ २३८
१० वसई विरार मनपा १७३ २२६०१ ५७२
११ रायगड ३३९ २९६८४ १६ ७३८
१२ पनवेल मनपा २६४ १९२९४ ३५६
१३ नाशिक २५१ १७४२७ ३७६
१४ नाशिक मनपा ६७३ ४९०८६ ३१ ७२१
१५ मालेगाव मनपा २८ ३५३८ १३८
१६ अहमदनगर ५०२ २४९५० ३७१
१७ अहमदनगर मनपा २०३ १४०१२ २६९
१८ धुळे ६२ ६५०५ १७७
१९ धुळे मनपा २९ ५५७३ १५०
२० जळगाव ४८३ ३५८७६ १५ ९४८
२१ जळगाव मनपा २०४ १००३६ २६३
२२ नंदूरबार ४८ ४९८९ ११४
२३ पुणे ११६२ ५७०६८ २७ ११५७
२४ पुणे मनपा १५५३ १४९१८७ १९ ३३७४
२५ पिंपरी चिंचवड मनपा ८०६ ७१६८७ १० १००३
२६ सोलापूर ४७७ २५३५२ ६२८
२७ सोलापूर मनपा ८२ ८६३८ ४७४
२८ सातारा ६४७ ३३५०० १९ ८४१
२९ कोल्हापूर ३९२ २९१०४ २८ ९३३
३० कोल्हापूर मनपा १३८ १२११२ ३१७
३१ सांगली ५१७ १८३८२ १९ ६२२
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा १७४ १६८०९ ४३९
३३ सिंधुदुर्ग ९२ ३५०२ ७०
३४ रत्नागिरी ५७ ७९७५ २४१
३५ औरंगाबाद १९२ १२१३४ २१८
३६ औरंगाबाद मनपा २५७ २२३५१ ६४१
३७ जालना १६३ ७२२९ १८५
३८ हिंगोली ४१ २७७५ ५२
३९ परभणी ६० २६८५ ८३
४० परभणी मनपा ३० २३९२ ९०
४१ लातूर २२४ ९८८१ २९८
४२ लातूर मनपा १४२ ६३९५ १६२
४३ उस्मानाबाद १८६ ११३४१ ३२०
४४ बीड २०६ ९४९३ २५६
४५ नांदेड ११३ ८२०५ २०१
४६ नांदेड मनपा ७८ ६३९७ १६८
४७ अकोला ४९ ३२१४ ८२
४८ अकोला मनपा ६९ ३५९५ १३५
४९ अमरावती १२१ ४२७१ १०५
५० अमरावती मनपा १३५ ८१६७ १४५
५१ यवतमाळ १८२ ७८६९ १६८
५२ बुलढाणा १७२ ६९८६ १०७
५३ वाशिम ६४ ३८९७ ८१
५४ नागपूर ३१९ १६५९५ १२ २८३
५५ नागपूर मनपा ११९० ५५३२८ ४१ १६४४
५६ वर्धा ७८ ३५६१ ५४
५७ भंडारा १०८ ४७०९ ९३
५८ गोंदिया ३२८ ५९९२ ६७
५९ चंद्रपूर ८४ ४९५९ ४१
६० चंद्रपूर मनपा ५६ ३७९२ ४२
६१ गडचिरोली ७४ १८५१ १३
इतर राज्ये /देश ३१ १४६६ १२६
एकूण १७७९४ १३००७५७ ४१६ ३४७६१