घरदेश-विदेशजेएनयु प्रकरण धुमसतच

जेएनयु प्रकरण धुमसतच

Subscribe

जेएनयुतील प्रकरणानंतर देशभर याचे तीव्र पडसाद उमटत आहेत.दोन्ही बाजूंचे पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत.मंगळवारी देखील या प्रकरणाशी संबंधित अनेक घटना घडल्या.जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (जेएनयू) विद्यार्थी संघटनेची अध्यक्षा आईशी घोषसह १९ जणांविरुद्ध दिल्ली पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. आंदोलन प्रकरणी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मंत्री जयंत पाटील ट्विटर युद्ध रंगले.तसेच सुरक्षिततेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी आंदोलनाची परवानगी नाकारली आहे.या घटनेचे तीव्र पडसाद गुजरातमध्ये देखील उमटले. एनएसयूआय आणि एबीव्हीपी यांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या हाणामारी झाली.तर हिंदू रक्षा दलाने विद्यापीठातील हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडांवर गुन्हा दाखल
जेएनयूतील विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथील आंदोलनात राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सहभाग घेतल्याप्रकरणी भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आक्षेप घेत तक्रार दाखल केली होती. आता त्या प्रकरणी कुलाबा पोलीस ठाण्यात आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेट वे ऑफ इंडियाजवळ झालेल्या आंदोलनात ‘काश्मीर को चाहिए आझादी’ अशा घोषणा देण्यात आल्याने सोमय्या यांनी याप्रकरणी कुलाबा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. ठाकरे सरकारमधील मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली अवैध आणि देशविरोधी ‘काश्मीर को चाहिए आझादी’ अशा घोषणा देण्यात आल्या. हे आंदोलन करण्यासाठी पोलिसांनी परवानगी दिली नव्हती. तरीही हे आंदोलन करण्यात आले असून, मंत्र्यांविरोधात कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सोमय्या यांनी तक्रारीत केली होती. अखेर पोलिसांनी या तक्रारीची दखल घेत आव्हाडांवर गुन्हा दाखल केला आहे.तर विद्यापीठातील हल्ला आम्हीच केल्याचे

- Advertisement -

एनएसयूआय, एबीव्हीपी कार्यकर्त्यांमध्ये राडा
5 जानेवारी रोजी जेएनयूमध्ये झालेल्या हल्ल्याच्या घटनेनंतर आज गुजरातच्या अहमदाबादमध्ये देखील हिंसक घटना घडली आहे. एनएसयूआय आणि एबीव्हीपी यांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या हाणामारीमध्ये 10 जण जखमी झाले आहेत.अहमदाबादमध्ये एनएसयूआयचे काही कार्यकर्ते एबीव्हीपीच्या कार्यालयाजवळ जेएनयूमधील घटनेचा निषेध करण्यासाठी घोषणाबाजी करत होते. या पार्श्वभूमीवर एबीव्हीपी आणि एनएसयूआयच्या कार्यकर्त्यांमध्ये आधी बाचाबाची आणि त्याचे पर्यवसान हाणामारीत झाले. जमावाला पांगवण्यासाठी अखेर पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. या घटनेमध्ये एकूण 10 जण जखमी झाले असून त्यातले काही गंभीर जखमी आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -