घरदेश-विदेशबंगाल सर करण्यासाठी भाजपनं चार खासदारांना उतरवलं विधानसभेच्या रिंगणात

बंगाल सर करण्यासाठी भाजपनं चार खासदारांना उतरवलं विधानसभेच्या रिंगणात

Subscribe

पश्चिम बंगलामध्ये ममता बॅनर्जींना पराभूत करण्यासाठी भाजप वेगवेगळे हातखंडे वापरत आहे. भाजपला काहीही करुन बंगालमध्ये सत्ता स्थापन करायची आहे. यासाठी सर्व बडे नेते प्रचारासाठी उतरले आहे. आता बंगाल विधानसभा निवडणुकीमध्ये टीएमसीला शह देण्यासाठी भाजपने नवीच खेळी खेळली आहे. बंगाल सर करण्यासाठी भाजपने केंद्रीय मंत्र्यासह चार खासदारांना विधानसभेच्या रिंगणात उतरवलं आहे. भाजपने थेट केंद्रीय मंत्री आणि खासदार बाबुल सुप्रियोसहीत चार खासदारांना विधानसभेच्या मैदानात उतरवले आहे. भाजपच्या या निर्णयाने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. पश्चिम बंगालच्या विधानसभेची निवडणूक २७ मार्चपासून सुरु होणार आहे. या निवडणुका ८ टप्प्यांमध्ये होणार आहेत.

भाजपने आज बंगाल निवडणुकीसाठी उमेदवारांची तीसरी यादी जाहीर केली. केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियोदेखील विधानसभा निवडणूक लढवतील, असं भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंह म्हणाले. टॉलीगंजमधून सुप्रियो यांना तिकिट देण्यात आलं आहे. बंगाल निवडणुकीत भाजपने एकूण ४ खासदारांना उभं केलं आहे. खासदार निशीथ प्रमाणिक यांना दिनहाटा विधानसभा मतदारसंघातून तर खासदर लॉकेट चटर्जी यांना चुंचुरा मतदारसंघातून तिकीट देण्यात आलं आहे. तसेच राज्यसभा सदस्य स्वपन दास गुप्ता यांना तारकेश्वरमधून तिकीट देण्यात आलं आहे.

- Advertisement -

पश्चिम बंगालमध्ये ८ टप्प्यांत मतदान होणार

पहिला टप्पा – २७ मार्चला मतदान
दुसरा टप्पा – १ एप्रिलला मतदान
तिसरा टप्पा – ६ एप्रिलला मतदान
चौथा टप्पा – १० एप्रिलला मतदान
पाचवा टप्पा – १७ एप्रिलला मतदान
सहावा टप्पा – २२ एप्रिलला मतदान
सातवा टप्पा – २६ एप्रिलला मतदान
आठवा टप्पा – २९ एप्रिलला मतदान

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -