घरताज्या घडामोडीRemdesivir इंजेक्शन WHO ने Prequalification list मधून वगळले

Remdesivir इंजेक्शन WHO ने Prequalification list मधून वगळले

Subscribe

जागतिक आरोग्य संघटनेने रेमडेसिवीरचा भारतात कोरोना रूग्णांच्या उपचारासाठी होणारा वापर पाहता एक मोठी घोषणा केली आहे. कोरोना रूग्णांच्या उपचारामध्ये रेमडेसिवीर वापरू नका असा सल्ला दिला आहे. Gilead sciences चे एंटीव्हायरल औषध असलेले रेमडेसिवीर औषध WHO ने आपल्या Prequalification list मधून सस्पेंड केले आहे. त्यामुळे लाईफ सेव्हींग ड्रग म्हणून रेमडेसिवीरच्या वापरावर आता मर्यादा आल्या आहेत. याआधीच भारतात केंद्रीय सार्वजनिक आरोग्य मंत्रालयाने प्लाझ्मा थेरपीवर बंदी आणली आहे. त्यापाठोपाठच जागतिक आरोग्य संघटनेचा निर्णय हा भारतातल्या रेमडेसिवीर वापरावर डोळ्यात अंजन घालण्यासारखा आहे. WHO ने रेमडेसिवीर खरेदी करण्याचा सल्ला देणार नाही असेही स्पष्ट केले आहे. संघटनेचे प्रवक्ता तारिक जसारेविकने यांनी ही बाब स्पष्ट केली आहे.

रॉयटर्स या वृत्तसंस्थेला दिलेल्या उत्तरामध्ये WHO ने रेमडेसिवीर वापराबाबतच्या सूचना स्पष्ट केल्या आहेत. त्यामध्ये Prequalification list मधून हे औषध वगळण्यात आल्याचे जागतिक आरोग्य संघटनेमार्फत स्पष्ट करण्यात आले. याआधीच म्हणजे गेल्याच आठवड्यात शुक्रवारी जागतिक आरोग्य संघटनेने स्पष्ट केले होते, की कोरोना रूग्णांच्या उपचारासाठी रेमडेसिवीरचा वापर व्हायला नको. कारण रेमडेसिवीरचा वापर केल्या कोरोना रूग्णांच्या आरोग्यावर कोणताही अनुकुल परिणाम झाल्याचे कुठेच स्पष्ट झालेले नाही. त्यामुळेच रेमडेसिवीरचा होणारा अतिवापर थांबवावा असे स्पष्टीकरण WHO मार्फत देण्यात आले होते. भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणात संसर्गानंतर रेमडेसिवीर इंजेक्शनचा मोठा तुटवडा निर्माण झाला होता. त्यामुळेच अनेक ठिकाणी रेमडेसिवीरचा काळाबाजारही सुरू झाल्याचे स्पष्ट झाले होते. भारतात कोरोनाचा कहर पाहता जगभरातील अनेक देशांकडून भारताला मदतीचा हात पुढे करण्यात आला आहे. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात मदत करण्यात अमेरिकेसारख्या देशाचाही सहभाग आहे. अमेरिकेकडून नुकतेच भारताला सव्वा लाख रेमडेसिवीरच्या कुप्या मिळाल्या होत्या. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता असलेले अरिंदम बागची यांनीही अमेरिकेतून सव्वा लाख इतक्या मोठ्या प्रमाणात रेमडेसिवीरच्या कुप्या या अमेरिकेतून चौथ्या फ्लाईटमधून आल्याचे स्पष्ट केले होते.

- Advertisement -

 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -