घरदेश-विदेशहनीमूनला गेलेल्या डॉक्टर पतीचं फुटलं बिंग; पत्नीनं पोलिसांना बोलवून दाखल केला गुन्हा

हनीमूनला गेलेल्या डॉक्टर पतीचं फुटलं बिंग; पत्नीनं पोलिसांना बोलवून दाखल केला गुन्हा

Subscribe

पीडितेच्या तक्रारीवरून पोलिस तपास करत आहेत.

आग्राच्या महिला पोलीस ठाण्यात एका महिलेने हुंड्याचा छळ, मारहाण, फसवणूक आणि इतर कलमांतर्गत आपल्या पतीविरूद्ध खटला दाखल केला आहे. या महिलेने असा आरोप केला की, हनीमूनला गेल्यावर तिच्या पतीने तिला असे सांगितेल की, मी समलिंगी असून मला गंभीर आजाराने ग्रासले आहे. एवढेच नाही तर त्याने पत्नीला ठार मारण्याचा प्रयत्न केला. हुंड्यासाठी सासरच्यांनी तिला त्रास दिला असून पीडितेच्या तक्रारीवरून पोलिस तपास करत आहेत.

कोतवाली भागात राहणाऱ्या या मुलीने सांगितले की, तिचे लग्न हाथरसच्या अलीगड रोड येथील रहिवासी युवकाशी मे २०१९ रोजी झाले होते. तो तरुण डॉक्टर आहे. मुलीच्या म्हणण्यानुसार तिने लग्नात ३० लाख रुपये खर्च केले होते. सासरचे लोकसुद्धा या गोष्टीवर खूष नव्हते. लग्नानंतर ते तिला सारखे टोमणे मारायचे. दोन दिवसांनंतर पती कुल्लू मनालीला तिला हनीमूनला घेऊन गेला.

- Advertisement -

असे केले पत्नीने पतीवर आरोप…

हॉटेलमध्ये नवऱ्याने तिला मारहाण केली असा महिलेचा आरोप आहे. तसेच चालताना डोंगरावरून पडण्याचा प्रयत्न केला, मात्र तिने स्वतःला सावरले आणि ती वाचली. हॉटेलमध्ये आल्यानंतरही धमकी देखील दिली. यादरम्यान, नवरा तिला म्हणाला, तो समलैंगिक आहे. याला विरोध केल्याबद्दल जबर मारहाणही केली. यावेळी तिचा मोबाइल तोडला आणि गळा दाबण्याचा प्रयत्नही केला. हॉटेल कर्मचाऱ्यांनी तिची सुटका केली. या घटनेची माहिती मिळताच मनाली पोलिस तेथे पोहोचले. पोलिसांनी पतीशीही चर्चा केली. त्यावेळी हे प्रकरण शांत झाले. यानंतर हे दोघेही हनीमूनहून परत आपल्या घरी आले. तिच्या सासरी आल्यानंतर ती मुलगी आपल्या माहेरी गेली. ऑगस्ट २०१९ मध्ये सासरच्यांनी तिच्याकडून दहा लाख रुपयांची मागणी केली. पीडितेने पोलिसांत तक्रार दिली असून कौटुंबिक समुपदेशन केंद्रात या प्रकरणाची सुनावणी झाली.

पीडित महिलेने ११ सप्टेंबर रोजी पतीविरूद्ध महिला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. तिने तिच्या पतीवर फसवणूक, हुंडाबळी, मारहाण, अत्याचार, जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप केला आहे. विचारविनिमयानंतर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी तिला सांगितले आहे.


अधिकाऱ्याचं बिंग फुटलं! Corona चं कारण देत घरी जाणं टाळलं; पत्नीनं प्रेयसीसह रंगेहात पकडलं
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -