लवकरच अक्षयच्या ‘बेल बॉटम’चा टीझर रिलीज होणार

bollywood actor akshay kumar bell bottom teaser launched first week of october
लवकरच अक्षयच्या 'बेल बॉटम'चा टीझर रिलीज होणार

जेव्हा देशात अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली, त्यादरम्यान अक्षय कुमार हा बॉलिवूडचा पहिला अभिनेता आहे, ज्याने चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली. अक्षयच्या या चित्रपटाचे नाव ‘बेल बॉटम’ असे असून लवकरच याचा टीझर देखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. माहितीनुसार, ‘बेल बॉटम’ चित्रपटाच्या टीमने १ मिनिटांचा टीझर रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे. या चित्रपटाचा प्रोमो तयार झाला असून त्याला फिनिशिंग टच देण्याचे बाकी आहे. दरम्यान ‘बेल बॉटम’ चित्रपटाचा टीझर ४ ऑक्टोबरला रिलीज होऊ शकतो, मात्र एक ते दोन दिवस देखील टीझर रिलीज होण्यासाठी उशीरा होऊ शकतो. पण सुत्रांच्या मते या चित्रपटाचा टीझर ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात रिलीज केला जाऊ शकतो.

या चित्रपटात अक्षय कुमारसोबत वाणी कपूर मुख्य भूमिकेत असून हुमा कुरेशी आणि लारा दत्ता देखील महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाची कथा असीम अरोडा आणि परवीज शेख यांनी लिहिली आहे. पुढच्या वर्षी २ एप्रिल रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

८०च्या दशकातील एका सत्य घटनेवर आधारित ‘बेल बॉटम’ चित्रपट आहे. हा एक स्पाय थ्रिलर चित्रपट आहे. यामध्ये अक्षय डिटेक्टिवच्या भूमिकेत दिसणार आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये अक्षय कुमारने या चित्रपटातील पहिला लूक प्रदर्शित केला होता. ‘बेल बॉटम’ या चित्रपटाची निर्मिती वाशु आणि जॅकी भगनानी सोबत निखिल अडवाणी देखील करत आहे. दरम्यान, येत्या काळात अक्षयचे ‘सूर्यवंशी’ ‘लक्ष्मी बम’, ‘पृथ्वी राज’ ‘बच्चन पांडे’, ‘अतरंगी रे’ ‘धूम 4’ आणि ‘बेल बॉटम’ असे एकूण सात चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. तसेच लवकरच तो ‘बाप रे बाप’ या चित्रपटातही झळकणार असल्याचे म्हटले जात आहे.