घरदेश-विदेशमहिलेने नोंदवला अॅसिड हल्ल्याचा खोटा गुन्हा

महिलेने नोंदवला अॅसिड हल्ल्याचा खोटा गुन्हा

Subscribe

निकाह हलालाचा विरोध करणाऱ्या महिलेने उत्तर प्रदेश पोलिसांकडे खोटा गुन्हा नोंदवला आहे. आपल्यावर अॅसिड हल्ला झाल्याचे तिने पोलिसांना सांगितले.

मुस्लिम धर्मातील निकाह हलाला आणि बहुपत्नीत्व प्रथांविरोधात आवाज उचलणाऱ्या महिलेने अॅसिड हल्ल्याची खोटी तक्रार नोंदवली असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. समीना बेगम असे या महिलेचे नाव आहे. मागील काही दिवसांपासून सलिमा निकाह हलाला आणि बहुपत्नीत्व प्रथांचा विरोध करत होत्या. सलिमाने स्वतावर आणि इतर दोन महिलांवर अॅसिड हल्ला झाल्याच्या खोट्या तक्रारी नोदंवल्या आहेत. खोट्या तक्रारी नोंदवल्या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतरही निकाह हलाल आणि बहुपत्नीत्व सर्रास सुरु असल्याचा आरोप समीना बेगम यांनी केला आहे.

काय आहे प्रकरण

उत्तर प्रदेश पोलीस अधीक्षक प्रवीण रंजन यांनी दिलेल्या माहिती प्रमाणे, समीनाने आपल्या पती विरोधात पोलिसांकडे तक्रार नोंदवली होती. प्रथेविरोधात बोलल्यामुळे तिच्यावर अॅसिड हल्ला करण्यात आला असे या तक्रारीत म्हटले आहे. १४ ऑक्टोबर रोजी ही तक्रार नोंदवण्यात आली. मात्र तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेज तपासल्यावर असा प्रकार घडला नसल्याचे समोर आले. समीनाने नरेंद्र पालीवाल आणि डीसी वर्मा या दोघांबरोबर मिळून अॅसिड हल्ल्याचे नाटक केले असल्याचे समोर आले.

- Advertisement -

पूर्वी ही नोंदवलेले खोटो गुन्हे

प्रवीण रंजन यांनी सांगितले की, ” आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार यापूर्वीही अॅसिड हल्ल्याचे दोन खोटे गुन्हे नोंदवण्यात आले. आम्ही समीनाविरोधात पुरावे तपासत आहोत. पुरावा मिळाल्यानंतर आम्ही तिच्यावरोधात तक्रार नोंदवणार आहोत.”

मला फसवण्याचा पोलिसांचा प्रयत्न

या प्रकरणात समीनाने तिच्यावर असलेले आरोप फेटाळले आहेत. “नेहेमीच मी तिहेरी तलाक, निकाह हलाला आणि बहुपत्नीत्व प्रथांविरोधात महिलांच्या बाजूने उभी आहे. आता मला मदतीची गरज आहे तर कोणीही माझ्या बाजूने उभे नाही. पोलीस मला फसवण्याचा प्रयत्न करत आहे.”

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -