घरCORONA UPDATEजागतिक कोरोना अपडेटCorona Update: जगातील कोरोना बळींच्या संख्येने ओलांडला ६ लाखांचा टप्पा!

Corona Update: जगातील कोरोना बळींच्या संख्येने ओलांडला ६ लाखांचा टप्पा!

Subscribe

संपूर्ण जगात कोरोना विषाणूचा विळखा घट्ट होताना दिसत आहे. जगात रोज २ लाखांहून अधिक रुग्ण आढळत आहेत. गेल्या २४ तासांत जगात २.२४ लाख नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ५ हजार ८ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे जगभरातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा १ कोटी ४४ लाखांहून अधिक आहे. तर कोरोना बळीचा आकडा ६ लाख पार झाला आहे. आतापर्यंत ६ लाख ४ हजारांहून अधिक जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. जगातील वाढत्या कोरोनाबाधितांच्या आकड्याप्रमाणेचे रुग्ण बरे होणाच्या आकडा देखील वाढत आहे. जगात आतापर्यंत ८६ लाखांहून अधिक जण कोरोनामुक्त झाले असून सध्या ५२ लाखांहून जास्त अॅक्टिव्ह केसेस आहेत.

जगात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण अमेरिकेत आढळले आहेत. अमेरिका अजूनही जगातील कोरोनाबाधितांची यादी अव्वल स्थानावर आहे. अमेरिकेत आतापर्यंत ३८.३३ लाखांहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यापैकी १ लाख ४२ हजारांहून अधिक रुग्णांचा मृ्त्यू झाला आहे. अमेरिकेत गेल्या २४ तासांत ६३ हजारांहून अधिक नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ८१३ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. अमेरिकेनंतर ब्राझील देशात कोरोना विषाणूचा कहर सुरुच आहे. ब्राझीलमधील कोरोनाबाधितांचा आकडा २० लाख पार गेला आहे. तर मृतांचा आकडा ७८ हजार इतका आहे.

- Advertisement -

या १० देशांमध्ये सर्वाधिक कोरोनाबाधितांची संख्या

अमेरिका : कोरोनाबाधित – ३,८३३,२७१ – मृत्यू – १४२,८७७
ब्राझील : कोरोनाबाधित – २,०७५,२४६ – मृत्यू – ७८,८१७
भारत : कोरोनाबाधित – १,७७,६१८ – मृत्यू – २६,८१६
रशिया : कोरोनाबाधित – ७६५,४३७ – मृत्यू – १२,२४७
साउथ आफ्रिका : कोरोनाबाधित – ३५०,८७९ – मृत्यू – ४,९४८
पेरू : कोरोनाबाधित – ३४९,५०० – मृत्यू – १२,९९८
मॅक्सिको : कोरोनाबाधित – ३३१,२९८ – मृत्यू – ३८,३१०
चिली : कोरोनाबाधित – ३२८,८४६ – मृत्यू – ८,४४५
स्पेन : कोरोनाबाधित – ३०७,३३५ – मृत्यू – २८,४२०
ब्रिटन : कोरोनाबाधित – २९४,०६६ – मृत्यू – ४५,२७३


हेही वाचा – Corona Update: देशात २४ तासांत सर्वाधिक ३८ हजारांहून अधिक रुग्णांची नोंद!

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -