घरदेश-विदेशलाऊडस्पीकरबाबत सीएम योगींचा कडक आदेश; मंदिर असो वा मशीद मोठ्या आवाजातील स्पीकरवर...

लाऊडस्पीकरबाबत सीएम योगींचा कडक आदेश; मंदिर असो वा मशीद मोठ्या आवाजातील स्पीकरवर बॅन

Subscribe

दुसरीकडे, एडीजी कायदा आणि सुव्यवस्था प्रशांत कुमार म्हणाले की, आतापर्यंत राज्यातील 125 धार्मिक स्थळांवरून लाऊडस्पीकर हटवण्यात आले आहेत. याशिवाय सुमारे 17 हजार लोकांनी स्वतः आवाज कमी केला आहे.

देशभरात लाऊडस्पीकरवरून झालेल्या वादानंतर उत्तर प्रदेशच्या योगी सरकारने कडक निर्देश दिले आहेत. मंदिर असो वा मशीद कुठेही बेकायदेशीर लाऊडस्पीकर लावले असतील, ते तात्काळ हटवावेत, असे निर्देश सरकारने प्रत्येक पोलिस ठाण्याला दिले आहेत. तसेच धार्मिक स्थळांवर नियमानुसार ध्वनिक्षेपकांचा वापर करावा. या संदर्भात अध्यादेश जारी करत, अपर मुख्य सचिव गृह अवनीश अवस्थी यांनी उत्तर प्रदेशातील सर्व पोलीस ठाण्यांना मोहीम राबवून बेकायदेशीर व मोठ्या आवाजातील लाऊडस्पीकर तातडीने हटविण्यास सांगितले आहे. तसेच कारवाईचा अहवाल 30 एप्रिलपर्यंत शासनाला पाठवावा. तसे न केल्यास संबंधित स्टेशन प्रभारींवर कारवाई केली जाईल. असा इशारा देण्यात आला आहे.

अवनीश अवस्थी यांनी जिल्ह्यातील पोलिस अधिकारी आणि आयुक्तालय असलेल्या जिल्ह्यांच्या पोलिस आयुक्तांना धर्मगुरूंशी संवाद साधून बेकायदा लाऊडस्पीकर हटवण्याचे निर्देश दिले आहेत. यासोबतच जे कायदेशीर आहेत त्यांच्या आवाजासंदर्भातील ठरावीक नियमांचे पालन सुनिश्चित केले पाहिजे. 10 मार्च 2018 आणि 4 जानेवारी 2018 च्या आदेशाचा संदर्भ देत त्यांनी नियमांचे पालन सुनिश्चित करणे आवश्यक असल्याचे सांगितले आहे. यासोबतच नियमांचे दुर्लक्ष होत असलेल्या धार्मिक स्थळांची यादी तयार करण्यात यावी, असेही सांगण्यात आले आहे.

- Advertisement -

125 धार्मिक स्थळांवरून लाऊडस्पीकर हटविले

दुसरीकडे, एडीजी कायदा आणि सुव्यवस्था प्रशांत कुमार म्हणाले की, आतापर्यंत राज्यातील 125 धार्मिक स्थळांवरून लाऊडस्पीकर हटवण्यात आले आहेत. याशिवाय सुमारे 17 हजार लोकांनी स्वतः आवाज कमी केला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी धार्मिक स्थळांवर लाऊडस्पीकरचा वापर मानकांनुसार करावा, अशा सूचना दिल्या आहेत. या स्पीकरचा आवाज फक्त त्या आवारातच राहिला. या आदेशानंतर लाऊडस्पीकर हटवण्यात आले आहेत.


राज्यात बालविवाहामुळे कुपोषणाचे प्रमाण वाढले; 15 हजारांहून अधिक बालकं कुपोषणाचे शिकार

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -