घरट्रेंडिंगVideo : ATM लुटण्यासाठी बुलडोझर घेऊन पोहोचला चोर अन् अशी लढवली शक्कल

Video : ATM लुटण्यासाठी बुलडोझर घेऊन पोहोचला चोर अन् अशी लढवली शक्कल

Subscribe

पोलिसांना चकवा देण्यासाठी गुन्हेगार काय युक्त्या वापरती याचा काय नेमक नाही. अशाच एका चोराने चोरीसाठी अशी काही नामी शक्कल लढवली आहे जे पाहून सर्वांनाच धक्का बसला. वृत्तानुसार, महाराष्ट्रातील सांगली येथील एका बूथमधून चोरांनी एटीएम मशीन लुटण्यासाठी चक्क बुलडोझरचा वापर केला आहे, त्यानंतर या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सीसीटीव्ही फूटेजमधून वाचण्यासाठी चोरट्याने जेसीबी मशीनच्या साहाय्याने संपूर्ण एटीएम मशीन उखडून पळ काढल्याचा प्रयत्न केला आहे.

सीसीटीव्ह फुटेजमध्ये नेमक काय दिसतेय?

- Advertisement -

या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज यूट्यूबवर व्हायरल स्ट्रिंगरने शेअर केले आहे. त्याने कॅप्शनमध्ये सांगितले की, ही घटना 23 एप्रिलच्या रात्री घडली. अॅक्सिस बँकेच्या एटीएमच्या सीसीटीव्हीमध्ये एक व्यक्ती एटीएममध्ये शिरते, त्यानंतर लगेचच तिथून निघून जातो. यानंतर एक चोर बुलडोजरच्या मदतीने बूथचा दरवाजा तोडून एटीएम मशीन बाहेर खेचतो. मशीनमध्ये २५ लाख रुपये रोख असल्याचे सांगण्यात आलेय. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

गेल्या आठवड्यातही एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, ज्यामध्ये उत्तर प्रदेशातील चंदौली जिल्ह्यात हार्डवेअरचे दुकान लुटल्यानंतर चोर नाचताना दिसत होते. ही घटना पोलिस अधीक्षकांच्या निवासस्थानाजवळ घडली. दुकानाचे मालक अंशू सिंह यांनी सांगितले की, चोरट्याने हजारो रुपयांची रोकड आणि सामान चोरून नेले. मात्र, नंतर दुकानातील सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपीला पकडण्यात आले.

- Advertisement -

ही आहेत गुन्ह्यांची कारणे 

CCTV क्लिप व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडिया काही युजर्स या घटनेला ‘मनी हाइस्ट 2023’ म्हणत आहेत! या घटनेने अनेकांना धक्का बसला आहे, तर काहीजण या चोरीसाठी बेरोजगारी जबाबदार असल्याचे म्हटले आहे. बेरोजगारी आणि भुकमारी ही दोन मुख्य कारणे आहेत, ज्यामुळे लोक गुन्हेगारीकडे वळवत आहेत.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -