घरमनोरंजन'ठेच' हा आगामी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

‘ठेच’ हा आगामी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

Subscribe

प्रेमाचा त्रिकोण ही संकल्पना अजरामर आहे. ठेच या चित्रपटात प्रेमत्रिकोण ही संकल्पना नव्या कलाकारांसह नव्या पद्धतीने हाताळण्यात आली आहे.

“ठेच” हा मराठी आगामी चित्रपट येत्या १५ जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे, लक्ष्मण सोपान थिटे दिग्दर्शित ‘ठेच’ या चित्रपटातून प्रेमाची अनोखी कथा पाहायला मिळणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आलं आहे. या चित्रपटातील कथेत आई-वडील नसलेला शिवा मामाच्या घरी राहून आपलं दहावीचं शिक्षण पूर्ण करून कॉलेजला जातो. तिथे त्याची मैत्री शामबालाशी होते. शामबालाची मैत्रीण पल्लवी ही शिवाला खूप आवडते. तो मनोमनी तिच्या सोबत आयुष्याची स्वप्न रंगवत असतो. पण अशातचं शामबाला शिवाच्या प्रेमात पडते. शामबाला शिवाला प्रपोज करण्याअगोदर शिवा शामबाला जवळ पल्लावीला प्रपोज करतो. पण हट्टी शामबाला शिवाला कसं मिळवायचे हा प्लॅन करत असते. पण शिवाने पल्लवीला मिळवण्यासाठी आणि तिच्या स्वप्नासाठी केलेला रोमांचक प्रवास ‘ठेच’ या चित्रपटातून मांडला आहे.

श्री नृसिंह फिल्म प्रॉडक्शन प्रस्तुत “ठेच” या चित्रपटाची निर्मिती शिवाजी बोचरे, ज्ञानदेव काळे, सईद मोईन सईद नूर, कैलास थिटे, श्रीराम वांढेकर, गजानन टाके यांनी केली आहे. लक्ष्मण सोपान थिटे यांनी चित्रपटाचं कथालेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. किरण कोठेकर, हेमंत शेंडे यांनी छायांकन, फैसल आणि इमरान महाडिक यांनी संकलन, तन्मय भावे यांनी संगीत दिग्दर्शन केलं आहे.

- Advertisement -

प्रेमाचा त्रिकोण ही संकल्पना अजरामर आहे. ठेच या चित्रपटात प्रेमत्रिकोण ही संकल्पना नव्या कलाकारांसह नव्या पद्धतीने हाताळण्यात आली आहे. त्यामुळे “ठेच” नक्कीच प्रेक्षकांच्या पसंतीची पावती मिळवेल यात शंका नाही.

 

- Advertisement -

 

‘भारत माझा देश आहे’ मधून लाडू करणार चित्रपटसृष्टीत पदार्पण

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -