घरदेश-विदेशयोगी सरकारने दिली रवी किशनला Y प्लस सुरक्षा; ट्विट करत मानले आभार

योगी सरकारने दिली रवी किशनला Y प्लस सुरक्षा; ट्विट करत मानले आभार

Subscribe

अभिनेता आणि गोरखपूरचे लोकसभा खासदार रवी किशन यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. रवी किशन यांना योगी सरकारने Y प्लस कॅटेगरीतील सुरक्षा दिली असून यासाठी रवी किशनने त्यांचे आभार मानले आहे. रवी किशन यांच्या विरोधात सुरू असलेली विधाने आणि बॉलीवूडसंबंधी त्यांनी केलेल्या वक्तव्यांच्या पार्श्वभूमीवर ही सुरक्षा वाढवण्यात आली आहे. रवी किशन यांनी ट्विटमध्ये नमूद केले आहे की, माझ्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. मला व्हाय प्लस सुरक्षा देण्यात आली आहे. यासाठी माझे कुटुंबिय, मतदार संघातील नागरीक सर्वच आपले ऋणी आहेत. मी आपला आभारी आहे. यापुढेही माझा आवाज असाच संसदेत बुलंद राहील.

- Advertisement -

काय आहे प्रकरण 

रवी किशन यांनी लोकसभेत ड्रग्ज संदर्भात भाष्य केले होते. बॉलिवूडमध्ये ड्रग्जचे वाढते प्रमाण याबाबत रवी किशन यांनी चिंता व्यक्त केली होती. सरकारने ड्रग्जचे सेवन करणाऱ्या आणि त्याची तस्करी करणाऱ्यांवर बंदी घालावी, अशी मागणी करताना रवी किशन यांनी एनसीबीचं कौतुकही केले होते. ते म्हणाले होते की, भारतीय सिने जगतात ड्रग्ज घेणाऱ्यांचं प्रमाण जास्त आहे. या प्रकरणी काही जणांना अटकही केली आहे. एनसीबीही चांगल्या प्रकारे आपलं कर्तव्य पार पाडत आहे.

हेही वाचा –

‘योगींनी त्यांचं राज्य सांभाळावं’, गृहमंत्री अनिल देशमुखांनी टोचले कान!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -