घरसंपादकीयदिन विशेषप्रसिद्ध जीवाणू शास्त्रज्ञ वसंत खानोलकर

प्रसिद्ध जीवाणू शास्त्रज्ञ वसंत खानोलकर

Subscribe

वसंत रामजी खानोलकर यांचा आज स्मृतिदिन. त्यांनी भारतातील आधुनिक वैद्यकशास्त्राचा पाया घातला. ते प्रसिद्ध जीवाणू शास्त्रज्ञ होते. त्यांचा जन्म १३ एप्रिल १८९५ रोजी कोकणातील एका खेडेगावात झाला. त्यांचे वडील एक प्रतिष्ठित शल्यचिकित्सक होते. वसंत खानोलकरांनी लहानपणीच डॉक्टर व्हायचे ठरवले होते. वयाच्या १७ व्या वर्षी त्यांनी मुंबईच्या ग्रान्ट मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेतला.

वसंत रामजी खानोलकर यांचा आज स्मृतिदिन. त्यांनी भारतातील आधुनिक वैद्यकशास्त्राचा पाया घातला. ते प्रसिद्ध जीवाणू शास्त्रज्ञ होते. त्यांचा जन्म १३ एप्रिल १८९५ रोजी कोकणातील एका खेडेगावात झाला. त्यांचे वडील एक प्रतिष्ठित शल्यचिकित्सक होते. वसंत खानोलकरांनी लहानपणीच डॉक्टर व्हायचे ठरवले होते. वयाच्या १७ व्या वर्षी त्यांनी मुंबईच्या ग्रान्ट मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. त्याच वर्षी ते इंग्लंडला रवाना झाले. लंडन विद्यापीठातून त्यांनी विज्ञान शाखेची पदवी संपादन केली आणि १९१८ मध्ये वैद्यकीय पदवी मिळवली. १९२३ मध्ये ते रोगनिदानशास्त्रात (पॅथॉलॉजी) एम.डी. झाले. भारतात परत येऊन ते ग्रान्ट मेडिकल कॉलेजमध्ये पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांना रोगनिदानशास्त्र शिकवू लागले.

शिक्षणासाठी उपयुक्त विविध नमुन्यांचे संग्रहालय त्यांनी सुरू केले. रोगनिदानशास्त्राच्या पद्धतशीर शिक्षणाची सुरुवात त्यांनी केली. पाश्चात्य देशातील वैद्यकीय शिक्षणाच्या तुलनेत भारतीय शिक्षण कमी पडू नये म्हणून त्यांनी वैद्यकीय अभ्यासक्रमात अनेक बदल सुचवले. वैद्यकीय शिक्षणामध्ये मूलभूत विज्ञान, प्रायोगिक जीवशास्त्र, जीवरसायनशास्त्र, जीवभौतिकशास्त्र तसेच संख्याशास्त्र यांचे महत्वाचे स्थान त्यांनी ओळखले होते. त्यांनी या विषयाच्या अभ्यासाला नवीन दिशा दिली. त्यांनी सेठ जी. एस. मेडिकल महाविद्यालय व के. ई. एम. रुग्णालयात कामाच्या एका वेगळ्या परंपरेची सुरुवात केली.

- Advertisement -

त्यामुळे या संस्थांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरांवर एक अत्युत्तम वैद्यकीय संस्था असण्याचा मान मिळाला. जैवभौतिकी, उपयोजित जीवशास्त्र इत्यादी विषयांची सुरुवात त्यांनी मुंबई विद्यपीठात केली. या कालावधीत त्यांना कर्करोग आणि कुष्ठरोग यांच्या अभ्यासामध्ये विशेष कुतूहल व आवड निर्माण झाली. तेव्हा त्यांनी शिक्षकी पेशातून अंग काढून घेतले आणि टाटा मेमोरियल रुग्णालयात प्रमुख रोगनिदानतज्ज्ञ म्हणून १९४१ मध्ये ते रुजू झाले. त्यांनी कर्करोग, कुष्ठरोग, पुनरुत्पादनाचे शरीरशास्त्र, मानवी अनुवंशशास्त्र या विषयात संशोधन केले. अशा या प्रसिद्ध शास्त्रज्ञाचे २९ ऑक्टोबर १९७८ रोजी निधन झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -