घरसंपादकीयदिन विशेषभारत इतिहास संशोधक मंडळ

भारत इतिहास संशोधक मंडळ

Subscribe

भारत इतिहास संशोधक मंडळ ही भारताच्या व विशेषतः मराठेशाहीच्या इतिहासाचे संशोधन करणारी भारतातील एक अग्रगण्य स्वायत्त संस्था आहे. तिची स्थापना ७ जुलै १९१० रोजी इतिहासाचार्य वि. का. राजवाडे आणि खं. चिं. मेहंदळे यांनी केली. भारताच्या सर्वांगीण इतिहास संशोधनासाठी आवश्यक ती ऐतिहासिक साधने संग्रहीत करून त्यांचे शास्त्रशुद्ध जतन व प्रदर्शन करणे आणि त्यासाठी आवश्यक अशा इमारती बांधणे, ही संस्थेची सुरुवातीची उद्दिष्टे होती. पुढे ही साधने आणि भारतीय इतिहास व संस्कृती यांविषयीचे संशोधनात्मक ग्रंथ प्रसिद्ध करण्याचे कामही संस्थेने अंगीकारले.

संस्थेच्या घटनेनुसार मंडळाचा प्रमुख अध्यक्ष असून प्रशासकीय व्यवहार चिटणीसांमार्फत केला जातो. मंडळाचे वार्षिक व आजीव असे एकूण ५५० सभासद होते (१९८२). १३ सभासदांचे कारभारी मंडळ दर ३ वर्षांनी निवडतात. त्यातून चिटणीसांची निवड होते. विद्यमान ३ चिटणीस असून कार्याध्यक्ष व खजिनदार हे सर्व सभासदांनी प्रत्यक्ष निवडून द्यावयाचे असतात. अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची निवड दर ३ वर्षांनी सर्वसाधारण सभेत होते.

- Advertisement -

सभासदांना ग्रंथालय, पोथीशाळा, दप्तरखाना इत्यादी विभागात संशोधन करण्याची सुविधा आहे. मंडळ दर ३ महिन्यांनी ऐतिहासिक निबंध, वृत्ते वगैरे सामुग्रीसाठी एक मासिक प्रसिद्ध करते. तेही सभासदांना विनामूल्य मिळते. मंडळाने इतिहासतज्ज्ञांचे अनेक संशोधनपर ग्रंथ प्रकाशित केले आहेत. प्रतिवर्षी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मंडळाचे वार्षिक संमेलन भरते. तसेच मंडळाचा वाढदिवस, पाक्षिक सभा इ. प्रसंगी मंडळाचे सभासद, अभ्यासू व्यक्ती एकत्र येऊन शोधनिबंधाचे वाचन व चर्चा होते. मंडळाच्या प्रकाशानासाठी भारत सरकार व महाराष्ट्र शासन प्रतिवर्षी काही अनुदान देते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -