घरसंपादकीयवाणी संतांचीवाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

तरी स्पर्शें सर्वांग निववी । स्वादें जिव्हेतें नाचवी । तेवींचि कानांकरवीं । म्हणवीं बापु माझा ॥
तर त्या वार्‍याच्या स्पर्शाने जसे सर्व अंग गार होईल आणि गोडीने जिभेला समाधान होईल, तसेच मधुर सूर ऐकल्यावर कान वाहवा म्हणतील.
तैसें कथेचें इये ऐकणें । एक श्रवणासी होय पारणें । आणि संसार दु:ख मूळवणें । विकृतीविणें ॥
त्याचप्रमाणे हीच कथा ऐकल्याने कानाचे पारणे फिटेल आणि संसार दुःखापासून काहीएक विकार न होता ते आपोआप नाहीसे होईल.
जरी मंत्रेंचि वैरी मरे । तरी वायां कां बांधावीं कटारें? । रोग जाय दूधसाखरें । तरी निंब कां पियावा? ॥
जर मंत्रानेच शत्रूचा नाश होईल, तर मग कंबरेला कट्यार का बांधावी? तसे दूधसाखरेने जर रोग नाहीसे होतील, तर कडुनिंबाचे सेवन का करावे?
तैसा मनाचा मारु न करितां । आणि इंद्रियां दुःख न देतां । एथ मोक्षु असे आयता । श्रवणाचिमाजि ॥
त्याचप्रमाणे मनाला न जिंकता व इंद्रियांना दुःख न देता या श्रवणामध्येच आयताच मोक्ष आहे.
म्हणौनि आथिलिया आराणुका । गीतार्थु हा निका । ज्ञानदेवो म्हणे आइका । निवृत्तिदासु ॥
म्हणून, निवृत्तिदास ज्ञानदेव म्हणतात, ‘तुमच्या मनात जितकी उत्कंठा असेल, तितक्या उत्कंठेने हा गीतेचा अर्थ ऐका.’
मग पार्थु श्रीकृष्णातें म्हणे । हां हो हें कैसें तुमचें बोलणें । एक होय तरी अंत:करणकें । विचारूंये ॥
मग अर्जुन श्रीकृष्णास म्हणाला, ‘अहो, असले कसले हे तुमचे [दुटप्पी] बोलणे? तुम्ही एक काही तरी सांगाल तर त्याचा मनामध्ये विचार करता येईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -