घरसंपादकीयदिन विशेषथोर नेते, अर्थतज्ज्ञ दादाभाई नौरोजी

थोर नेते, अर्थतज्ज्ञ दादाभाई नौरोजी

Subscribe

दादाभाई नौरोजी यांचा आज स्मृतिदिन. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एक संस्थापक, थोर नेते व अर्थतज्ज्ञ होते. त्यांचा जन्म ४ सप्टेंबर १८२५ रोजी मुंबईत झाला. एल्फिन्स्टन इन्स्टिट्यूशन आणि एल्फिन्स्टन महाविद्यालय यांमधून शिक्षण घेऊन १८४५ मध्ये ते पदवीधर झाले. १८५० मध्ये एल्फिन्स्टन महाविद्यालयात दादाभाईंची गणित व तत्त्वज्ञान या विषयांचे सहाय्यक प्राध्यापक म्हणून नेमणूक झाली. या महाविद्यालयात प्राध्यापकपदावर नेमलेले दादाभाई हे पहिले भारतीय होत.

दादाभाई १८५५-५६ च्या सुमारास कामा यांच्या लंडनमधील व्यवसायातील एक भागीदार म्हणून लंडनला गेले तेथे त्यांचा ‘मँचेस्टर कॉटन सप्लाय असोसिएशन’, ‘कौन्सिल ऑफ लिव्हरपूल’, ‘अथेनियम’, ‘नॅशनल इंडियन असोसिएशन’ इत्यादी संस्थांशी जवळचा संबंध आला. १८६५-६६ पर्यंत त्यांनी लंडनच्या युनिव्हर्सिटी कॉलेजमध्ये गुजरातीचे प्राध्यापक म्हणून काम केले. १८६५ मध्ये लंडनमध्ये डब्ल्यू. सी. बॅनर्जी यांच्यासमवेत दादाभाईंनी ‘लंडन इंडिया सोसायटी’ ही संस्था स्थापली. १८६२ मध्ये त्यांनी ‘दादाभाई नौरोजी अँड कंपनी’ अशी स्वतःचीच कंपनी उभारली.

- Advertisement -

१८६६ मध्ये त्यांनी लंडनमध्ये ‘ईस्ट इंडिया असोसिएशन’ या संस्थेची स्थापना केली ते तिचे सचिवही होते. १८७३ मध्ये भारतीय अर्थकारणाविषयी नेमलेल्या संसदीय समितीपुढे (फॉसेट कमिटी) दादाभाईंनी साक्ष दिली. ही समितीदेखील त्यांच्या परिश्रमांचेच फलित होते. भारतीय अर्थशास्त्रीय विचारधारेमधील दादाभाईंचे मौलिक कार्य म्हणजे त्यांनी केलेले भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नाचे निर्धारण. एक समाजसुधारक म्हणून दादाभाईंचा लौकिक होता. जातिनिष्ठ मर्यादा पाळणे त्यांना मान्य नव्हते. स्त्रीपुरुष-समानता, स्त्रीशिक्षण यांचा त्यांनी सतत पुरस्कार केला. अशा या थोर अर्थतज्ज्ञाचे ३० जून १९१७ रोजी निधन झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -