घरसंपादकीयदिन विशेषसमाजसुधारक महर्षी विठ्ठल रामजी शिंदे

समाजसुधारक महर्षी विठ्ठल रामजी शिंदे

Subscribe

महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचा आज स्मृतिदिन. महर्षी शिंदे हे महाराष्ट्रातील अस्पृश्यता निवारण कार्यातील थोर समाजसुधारक, संशोधक व लेखक होते. त्यांचा जन्म २३ एप्रिल १८७३ रोजी कर्नाटकातील जमखंडी येथे झाला. त्यांनी जमखंडीतील इंग्रजी शाळेतून १८९१ मध्ये मॅट्रिक करून पुढे पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमधून बी.ए.ची पदवी मिळवली. कायद्याच्या शिक्षणाचे प्रथम वर्ष उत्तीर्ण केल्यावर ते एलएलबी परीक्षेकरिता मुंबईला गेले.

तेथे ते प्रार्थना समाजात दाखल झाले. महर्षी शिंदे हे मानवी मूल्यांची जोपासना करण्यासाठी अविरत प्रयत्न करणारे त्यागाचे व निष्ठेचे प्रतीक होते. अज्ञानाच्या पूजेविरुद्ध वैचारिक बंड पुकारून जुन्या धार्मिक अनिष्ट परंपरांचे जोखड फेकून देणारे ते सुधारक होते. त्यांनी स्वातंत्र्य समता व बंधुत्व या तत्त्वांसाठी माणसातला माणूस जागा केला. मानवाने मानवावर समभावाने प्रेम करावे तसा आचार सर्वत्र घडावा म्हणून आपले जीवन समर्पित करणारे ते कर्मयोगी होते.

- Advertisement -

१८ ऑक्टोबर १९०६ रोजी त्यांनी ‘डिप्रेस्ड क्लास मिशन’ या संस्थेची स्थापना केली. त्यांनी १९२८ मध्ये पुणे येथे शेतकरी परिषद भरवली. अस्पृश्य उद्धाराच्या कार्यासाठी त्यांनी १८ ऑक्टोबर १९०६ रोजी डिस्प्रेड क्लासेस मिशन सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेची मुंबईत स्थापना केली. अस्पृश्य समाजामध्ये शिक्षणाचा प्रसार करणे, अस्पृश्य बांधवांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देणे, त्यांच्या अडचणींचे निवारण करणे, अस्पृश्यांना खर्‍या धर्माची शिकवण देणे आणि त्यांचे शीलसंवर्धन घडवून आणणे, इत्यादी या संस्थेची प्रमुख उद्दिष्टे होती. अशा या थोर समाजसेवकाचे २ जानेवारी १९४४ रोजी निधन झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -