घरसंपादकीयवाणी संतांचीवाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

हें असो संतापु कैसा । चंद्रु न स्मरे जैसा । भूतीं भेदु नेणती तैसा । ज्ञानिये ते ॥
हे असो, परंतु ज्याप्रमाणे चंद्र हा उष्मा कसा आहे ते जाणत नाही, त्याचप्रमाणे ज्ञानी जे आहेत, त्यांना प्राणिमात्रांत फरक दिसत नाही.
मग हा मशकु हा गजु । कीं हा श्वपचु हा द्विजु । पैले इतरु हा आत्मजु । हें उरेल कें?॥
मग हे मशक किंवा हा हत्ती, तसाच हा अंत्यज किंवा हा ब्राह्मण, तसेच माझा मुलगा किंवा दुसर्‍याचा हे त्याच्यापाशी कोठून उरणार?
ना तरी हे धेनु हें श्वान । एक गुरू एक हीन । हें असो कैचें स्वप्न । जागतया ॥
ही गाय अथवा हा कुत्रा, एक थोर, एक लहान, अशा तर्‍हेचे द्वैतभावाचे स्वप्न अद्वैतबोधाचे ठिकाणी जागृत असलेल्या पुरुषांना कोठून पडणार?
एथ भेदु तरी कीं देखावा । जरी अहंभाव उरला होआवा । तो आधींचि नाहीं आघवा । आतां विषमु काई ॥
जेथे मीपणा उरला असेल तेथेच भेद दृष्टीस पडेल; परंतु तो जेथे अजिबात नाहीसा झाला असेल, तेथे भेद कोठून असणार?
म्हणौनि सर्वत्र सदा सम । तें आपणचि अद्वय ब्रह्म । हें संपूर्ण जाणें वर्म । समदृष्टीचें ॥
म्हणून, ज्याची नेहमी सर्वत्र सारखी दृष्टी आहे, तो स्वतःच अद्वितीय ब्रह्म आहे; ही समदृष्टीची पूर्ण खूण आहे. असे समज.
जिहीं विषयसंगु न सांडितां । इंद्रियांतें न दंडितां । परी भोगिली निसंगता । कामनेविण ॥
ज्याने विषयसंग तर सोडला नाही आणि इंद्रियांना दंडही केला नाही, असे असून संपूर्ण भोग भोगीत असतानाही वासना नसल्यामुळे अकर्तेपणाचा अनुभव घेतला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -