‘तू तेव्हा तशी मालिकेत’ येतंय एक मजेशीर गाणं; रविवारचा भाग असणार विशेष

दरम्यान या मालिकेत एक भन्नाट गाणं प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रविवारी प्रसारित होणाऱ्या विशेष भागात हे गाणं पाहायला मिळणार आहे.

झी मराठी(zee marathi) वरील तु तेव्हा तशी(tu tevha tashi) ही मालिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस तंतरते आहे. या मालिकेला चांगला प्रेक्षक वर्ग मिळत आहे. या मालिकेत अभिनेता स्वप्नील जोशी(swapnil joshi) आणि अभिनेत्री शिल्पा तुळसकर(shilpa tulaskar) यांच्या मुख्य भूमिका आहेत. मालिकेतील अनामिका आणि सौरभ यांची अव्यक्त प्रेम कथा प्रेक्षकांना फारच भावली आहे. दरम्यान या मालिकेत एक भन्नाट गाणं प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रविवारी प्रसारित होणाऱ्या विशेष भागात हे गाणं पाहायला मिळणार आहे.

हे ही वाचा – International Friendship Day 2022: जाणून घ्या ‘फ्रेंडशिप डे’ चा इतिहास; चित्रपटातूनही साजरा…

मालिकेत सौरभ आणि अनामिका(saurabh – anamika) या दोघांचे प्रेम फुलत असताना निल आणि राधा यांचे प्रेमही प्रेक्षकांना भूरळ घालते. यातच आता मालिका एक नविन वळण घेणार आहे. अनामिका सौरभ लग्न कधी करणार याकडे मालिकेच्या चाहत्यांचे लक्ष लागून राहिले असतानाच मालिकेत अचानकपणे आश्चर्यकारक घडामोडी घडताना दिसणार आहेत. रविवारच्या १ तासाच्या विशेष भागात एका सोहळ्यात खूप मजेदार गाणं प्रेक्षकांना बघायला मिळणार असून यात मालिकेतील सर्व कलाकार नटुन थटून या गाण्यावर ठेका धरताना पाहायला मिळणार आहे. या मजेदार मस्त गाण्याची सुंदर शब्द रचना आणि सुमधुर संगीत कुणाल करण यांचे आहे. तसेच हे मस्त ठेकेदार गाणं कुणाल करण आणि सागरीका जोशी यांनी ठसक्यात गायल आहे. या गाण्याचं दिग्दर्शक महाबलेश्वर नार्वेकर यांनी केले आहे. या गाण्याच चत्रिकरण नुकतंच झालं असून हे गाणं येत्या रविवारी १ तासाच्या विशेष भागात प्रेक्षकांना पाहायला मिळेल.

हे ही वाचा – ‘महारानी २’ च्‍या प्रतिभावान कलाकारांमध्‍ये अनुजा साठे चा समावेश

 

View this post on Instagram

 

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

मात्र मालिकेतला हा सोहळा नेमका कशासाठी हे अजूनही गुलदस्त्यात ठेवलेले पाहायला मिळत आहे. प्रेक्षक ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते तो क्षण म्हणजे अनामिका आणि सौरभचे(anamika- saurabh) लग्नसोहळा त्यांच्या लग्नाचा तर नसेल ना? हे जाणून घेण्यासाठी महाएपिसोडची उत्सुकता अधिक वाढली आहे. या गाण्यासाठी वल्ली आणि अनामिका देखील एकत्र आल्या आहेत. सोबतच चंदू चिमणा चिमणीचीही जोडी गाण्यात झळकणार आहे. या विशेष भागात अनामिका आणि सौरभ प्रेक्षकांना एक सरप्राईज देणार आहेत. हे सरप्राईज काय असेल याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये निर्माण झाली आहे. दिवसेंदिवस या मालिकेची लोकप्रियता वाढत आहे.

हे ही वाचा – ‘बस बाई बस’मध्ये अजित पवारांच्या पहाटेच्या शपथविधीबाबत सुप्रिया सुळेंनी दिलं मजेशीर उत्तर