घरमनोरंजन...अन् कार्तिक आर्यनच्या चाहितीने चक्क गाल खेचले

…अन् कार्तिक आर्यनच्या चाहितीने चक्क गाल खेचले

Subscribe

कार्तिक आर्यनच्या चाहत्यांनी पाहताच क्षणी गंमतीदार पद्धतीने आनंद व्यक्त केला.

अभिनेता कार्तिक आर्यन हा चॉकलेट बॉय बॉलिवूडमध्ये ओळखला जातो. सध्या कार्तिक हा लखनौमध्ये एका चित्रपटच्या चित्रिकरणासाठी व्यस्त आहे. कार्तिकचे चाहते हे त्याचावर खूप प्रेम करतात. म्हणून चित्रपटाच्या चित्रिकरणातून थोडा वेळ मिळाला तेव्हा तो चाहत्यांनी भेटायला गेला. त्यावेळी चाहत्यांनी कार्तिक आर्यनला पाहताच क्षणी गंमतीदार पद्धतीने आनंद व्यक्त केला. या गंमतीदार क्षणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या व्हिडिओमध्ये कार्तिक आर्यनच्या चाहत्यांनी सेल्फी घेण्यासाठी वेढलेले आहे. या सर्व गोंधळात अचानक एक मुलगी त्याचा गाल खेचते. कार्तिकने स्वतःच्या इन्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ फारच मजेशीर आहे. या व्हिडिओमध्ये ती मुलगी कार्तिकचे गाल खेचून इतकी आनंदी होते की जणू काही तिने एखादे धाडस पूर्ण केलं आहे.

- Advertisement -

सध्या कार्तिक आर्यन हा लवकरच भूमी पेडणेकर आणि अनन्या पांडे यांच्यासोबत ‘पति, पत्नी और वो’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपटा ६ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. याव्यतिरिक्त कार्तिका हा ‘दोस्ताना २’ मध्ये दिसणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -