घरमुंबईवसईत हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; ५ तरुणींची सुटका

वसईत हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; ५ तरुणींची सुटका

Subscribe

वसईत हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले आहे. या कारवाईतून ५ तरुणींची सुटका झाली.

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर एका हॉटेलमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले आहे. एका हाय प्रोफाईल हॉटेलमध्ये डान्स ग्रुपच्या नावाखाली हा सर्व प्रकार सुरु होता. मात्र, पोलिसांना याबाबत टीप मिळाल्यावर त्यांनी बनावट ग्राहक हॉटेलमध्ये पाठवला. या बनावट ग्राहकाने रेड सिग्नल दिल्यावर पोलिसांनी तिथे धाड टाकली. यातून ५ पीडित तरुणींची सुटका झाली आहे. पोलिसांनी याप्रकरणी तिघांना अटक केली आहे.

काय आहे नेमके प्रकरण?

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर वसई फाटा येथील रुद्रा इंटरनॅशनल शेल्टर हॉटेलमध्ये हायप्रोफाईल सेक्स रॅकेट सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी बनावट ग्राहक पाठवून साफळा रचला. बनावट ग्राहकाने रेड सिग्नल दिल्यानंतर पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी, सहायक पोलीस निरीक्षक सिद्धवा जायभाये आणि वसई युनिटच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी धाड टाकली. या कारवाईतून मुंबई, मिरा भाईंदर येथे राहणाऱ्या २५ ते ३० वयोगटातील पाच पीडित तरुणींची सुटका झाली. याशिवाय डान्स ग्रुपचे आयोजन करणारे आणि ग्राहकांना बोलावणाऱ्या तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली. यामध्ये मालाडला राहणारा शेहनवाज रेहमान खान (४०), जोगेश्वरीला राहणारा साजिद इकबाल खान (३९) या दोन एजंटचा समावेश आहे. त्याचबरोबर हॉटेलमध्ये डान्ससाठी रूममध्ये डीजे, साऊंड सिस्टीम, लाईट सिस्टीम, कम्प्युटर याची सुविधा करणारा आणि हॉटेलमध्ये रूम बुक करणाऱ्या पवई येथे राहणारा दीपक वाल्मिकी (३०) यालाही अटक करण्यात आली.

- Advertisement -

हेही वाचा – सलग दुसर्‍या दिवशीही वसई पालघर पाण्याखाली

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -