घरताज्या घडामोडीKhatija Rahman Engagement: ए.आर. रहमानची मुलगी खतीजा रहमानने केला साखरपुडा

Khatija Rahman Engagement: ए.आर. रहमानची मुलगी खतीजा रहमानने केला साखरपुडा

Subscribe

साखरपुड्यासाठी खतीजा पिंक कलरच्या सुंदर आउटफिटमध्ये दिसली. फोटोमध्ये खतीजाचा संपूर्ण चेहरा मास्कने झाकलेला आहे.

प्रसिद्ध संगितकार ए.आर. रहमान (A.R.Rahman)  यांची मुलगी खतीजा रहमान हिचा 29 डिसेंबर2021रोजी ऑडिओ इंजिनीअर रियासदीन शेख मोहम्मद (riyasdeen shaik mohamed)  याच्यासोबत साखरपुडा पार पडला. (Khatija Rahman Engagement)  विशेष म्हणजे खतीजाच्या वाढदिवसाच्या दिवशी साखरपुड्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. २९ डिसेंबरला खतीजाचा वाढदिवस असतो. वाढदिवसा दिवशी काही खास लोक आणि मित्र मंडळींच्या उपस्थितीत साखरपुड्याचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. खतीजाने सोशल मीडियावर तिच्या साखरपुड्याची माहिती तिच्या चाहत्यांना दिली. आयुष्याची नवीन सुरुवात करत असून सर्वांचे आशिर्वाद कायम सोबत राहूद्यात असे खातिजाने म्हटले आहे.

खातिजाने तिच्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, ‘ईश्वराच्या आशिर्वादाने मी आणि रियासदीनने साखरपुडा केला. मला या गोष्टीचा फार आनंद होत आहे. 29 डिसेंबरला माझ्या वाढदिवसाच्या दिवशी माझ्या आयुष्यातील महत्त्वाचा क्षण माझे कुटुंब आणि मित्र मैत्रिणींच्या उपस्थित पार पडला’. खातिजाच्या पोस्टनंतर अनेकांनी तिला नव्या आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. खातिजाचा पती रियासदीन करतो काय असा प्रश्न सर्वांना पडला. मात्र खातिजाने तिच्या पोस्टमध्येच रियासदीन विषयी देखील सांगितले आहे. खतीजाने लिहिले आहे, खतीजाच्या नवऱ्याचे संपर्ण नाव रियासदीन शेख मोहम्मद असून ‘रियासदीन हा एक इंटरप्रेन्यूअर आणि विजकिड साउंड इंजीनियर आहे.

- Advertisement -

साखरपुड्यासाठी खतीजा पिंक कलरच्या सुंदर आउटफिटमध्ये दिसली. फोटोमध्ये खतीजाचा संपूर्ण चेहरा मास्कने झाकलेला आहे. तर दुसऱ्या फ्रेममध्ये रियासदीनचा फोटो आहे. रियासदीनच्या ब्लॅक अँड व्हाइट फोटोने सर्वांने लक्ष वेधून घेतला.

 

View this post on Instagram

 

A post shared by 786 Khatija Rahman (@khatija.rahman)

- Advertisement -

 

खतीजाच्या वर्क फ्रंटविषयी बोलायचे झाले तर खतीजाने अनेक तमिळ सिनेमांमध्ये काम केले आहे. खतीजा २०१९मध्ये ‘मिमी’ यांच्या ‘रॉक अ बाय बेबी’ या गाण्यात दिसली होती. खतीजा आणि रियासदीन यांच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी त्यांच्या शुभेच्छा दिल्या आहेत. गायिका हर्षदीप कौरने कमेंट करत ‘दोघांना नवीन आयुष्याच्या शुभेच्छा देव तुमचे भले करो’, असे म्हटले आहे. तर ‘छोटी मुलगी मोठ्या रस्त्यावर चालण्यासाठी तयार आहे’, असे म्हणत श्वेत पंडित हिने शुभेच्छा दिल्या आहेत.


हेही वाचा – बोल्ड अभिनेत्री हेमांगी कवीचा मोनोकिनीतला हॉट अवतार

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -