घरमनोरंजनबोल्ड अभिनेत्री हेमांगी कवीचा मोनोकिनीतला हॉट अवतार

बोल्ड अभिनेत्री हेमांगी कवीचा मोनोकिनीतला हॉट अवतार

Subscribe

बाई आणि बूब्स, ब्रालेस अशा विषयांवरून तर नुकत्याच लग्नाच्या वाढदिवशी शेअर केलेल्या पोस्टमुळे चर्चेत असलेली मराठमोळी अभिनेत्री हेमांगी कवी धुमाळ पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. पण यावेळी कुठल्याही विधानावरून किंवा पोस्टमुळे नाही तर मोनोकिनीतल्या हॉट लूकमधील व्हिडीओ आणि फोटोने हेमांगीने चाहत्यांना भुरळ घातली आहे.

हेमांगी ही तिच्या बिनधास्त आणि भिडस्त स्वभावामुळे ओळखली जाते. ती उत्तम अभिनेत्री तर आहेच. पण फटकळही आहे.  तिला सोशल मीडियाची आवड असल्याने ती सतत सोशल मीडियावर तिच्या अपडेट्स फोटोज व्हिडीओही शेअर करते. तिने नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात हेमांगीने लाल रंगाची मोनोकिनी घातली आहे. व्हिडीओत पेहला नशा गाणंही ऐकायला येत असून हेमांगीने हा व्हिडीओ शेअर केला आहे. २०२२ ची सुरुवात अशी कॅप्शन हेमांगीने दिली आहे.

- Advertisement -

मोनोकिनीत हेमांगी बोल्ड ब्युटीफूल तर दिसतेच आहे. पण तिला या हॉट अवतारात कधी पाहीले नसल्याने तिचे चाहते मात्र पुरते घायाळ झाले आहेत.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -