घरताज्या घडामोडीReliance Jio ने ग्राहकांना मेल पाठवून दिली चेतावणी ; एका चुकीमुळे होऊ...

Reliance Jio ने ग्राहकांना मेल पाठवून दिली चेतावणी ; एका चुकीमुळे होऊ शकते लाखोंचे नुकसान

Subscribe

रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांना मेल पाठवून चेतावणी दिली आहे. रिलायन्सने आपल्या ग्राहकांनी वेगाने वाढणाऱ्या फसवणुकीबाबत सावध करण्याचा प्रयत्न केला आहे. काही सायबर गु्न्हेगार मोबाईल क्रमांक ईकेवायसीच्या नावावर काही माहिती काढायचे सांगून लोकांना फसवत असतात.

हल्लीचे युग हे डिजिटलमुळे ज्याप्रकारे सोयीस्कर झाले आहे त्याचप्रमाणे अनेक सायबर गुन्हेसुद्धा वाढीस लागले आहेत.रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांना मेल पाठवून चेतावणी दिली आहे. रिलायन्सने आपल्या ग्राहकांनी वेगाने वाढणाऱ्या फसवणुकीबाबत सावध करण्याचा प्रयत्न केला आहे. काही सायबर गु्न्हेगार मोबाईल क्रमांक ईकेवायसीच्या नावावर काही माहिती काढायचे सांगून लोकांना फसवत असतात. तुमच्या मोबाईल क्रमांकावर मेल पाठवून तुमचे लाखोंचे नुकसान करत असतात. मात्र रिलायन्स अशाचप्रकारे एक मेल पाठवून ग्राहकांना सावध करत आहे.

रिलायन्स जिओने म्हटले आहे की, ग्राहकांची सुरक्षा ही आमच्यासाठी सर्वात पहिली सुरक्षा आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक सायबर हल्ले समोर आल्याचे पाहायला मिळत आहेत. काही सायबर गुन्हेगार हे ग्राहकांकडून आधार क्रमांक,बँक खाते तपशील आणि ओटीपी मिळवायचा प्रयत्न करत त्यांना फसवण्याचा प्रयत्न करतात. EKYC च्या नावाखाली ही मोठ्या प्रमाणात फसवणूक केली जाते.

- Advertisement -

याशिवाय रिलायन्स जिओने मेलमध्ये म्हटले आहे की, हे टपून बसलेले सायबर गुन्हेगार ग्राहकांना सांगतात की, EKYC पूर्ण न केल्यास तुमच्या सेवा बंद होऊ शकतात. अनेकदा या गुन्हेगारांकडून कॉलबॅक नंबरही दिला जातो. ग्राहकांनी त्या नंबरवर कॉल केल्यास गुन्हेगारांकडून थर्ड पार्टी अ‍ॅप इन्स्टॉल करायला सांगितले जाते .ग्राहकांनी असे केल्यास गुन्हेगारांना तुमच्या फोनवर रिमोट अ‍ॅक्सेस मिळतो.

अशाप्रकारे टाळू शकता फसवणूक

  • रिलायन्स जिओ कंपनी ही कोणतेही थर्ड पार्टी अॅप डाऊनलोड करायला सांगत नाही.ग्राहकांना काही गोंधळ असेल तर, कंपनीच्या MyJio अ‍ॅपवर माहिती मिळवू शकता.
  • कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करु नका.
  • कोणतेही रिमोट अ‍ॅक्सेस अ‍ॅप डाऊनलोड करु नका.
  • तुमचा पिन किंवा पासवर्ड वेळोवेळी बदलत रहा.
  • सिमकार्डच्या मागे लिहिलेला २० अंकी नंबर कोणालाही सांगू नका.
  • तुमचे बँक स्टेटमेंट नियमितपणे तपासा.

हे ही वाचा – सावधान ! ‘Google Chrome’वर लॉगिन आयडी,पासवर्ड Save करताय? असं होईल तुमचं अकाउंट हॅक

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -