घरमनोरंजनLaal Singh Chaddha : ‘लाल सिंह चढ्ढा’च्या प्रदर्शनाच्या तारखेत बदल

Laal Singh Chaddha : ‘लाल सिंह चढ्ढा’च्या प्रदर्शनाच्या तारखेत बदल

Subscribe

बॉलिवूड अभिनेता आमिर खानने वेगवेगळ्या धाटणीच्या चित्रपटातून उत्कृष्ट अभिनयाची मोहर उमटवली. अभिनेत्याने करिअरमध्ये आत्तापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. मात्र, आत्ता काही निवडक चित्रपटांतून तो प्रेक्षकांचे मनोरंजन करतोय. या चित्रपटांसाठी मिस्टर परफेक्शनिस्ट शूटिंगमध्ये अधिक मेहनत घेताना दिसतोय. बर्‍याच दिवसांपासून आमिर खान बहुचर्चित ‘लाल सिंह चढ्ढा’ या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त होता. नुकतच या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले आहे. अशातच आमिरच्या या चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख समोर आली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून आमिरच्या ‘लाल सिंह चढ्ढा’ चित्रपटाबाबत चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता होती. यामुळे हा चित्रपट नाताळच्या मुहूर्तावर प्रदर्शित करण्याची घोषणा झाली. मात्र, कोरोनामुळे चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले. आमिर खान प्रोडक्शनने इन्स्टाग्राम अकाऊंटवरून चित्रपटाची नवीन तारीख जाहीर केली आहे. ‘लाल सिंह चढ्ढा’ हा चित्रपट वर्ष २०२२ मध्ये व्हेलेंटाइन्स डेच्या दिवशी प्रदर्शित केला जाणार आहे.

- Advertisement -

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Aamir Khan (@amirkhanactor_)


आमिर खान प्रोडक्शन अकाऊंटवरून माहिती देत सांगण्यात आले की, राज्य सरकारने २२ ऑक्टोबरपासून चित्रपटगृह पुन्हा सुरू करण्याच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. मात्र, कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रकोपामुळे विलंब होत असल्याने नाताळच्या दिवशी चित्रपट प्रदर्शित करू शकणार नाही. त्यामुळे हा चित्रपट व्हॅलेंटाइन डे २०२२ च्या दिवशी प्रदर्शित केला जाईल, असा निर्णय घेतला आहे. ‘लाल सिंग चढ्ढा’ हा चित्रपट टॉम हॅक्स यांच्या हॉलिवूड चित्रपटाचा फॉरेस्ट गंपचा अधिकृत ऑफिशियल रिमेक आहे. या चित्रपटात आमिर खानसोबत अभिनेत्री करिना कपूर-खान झळकणार आहे.

- Advertisement -

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -