घरमनोरंजनआशा पारेख यांनी आवडते भन्साली यांचे चित्रपट

आशा पारेख यांनी आवडते भन्साली यांचे चित्रपट

Subscribe

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनचा ‘सुपर डान्सर पर्व 3’ या पर्वातील लहान मुलांनी हा रिअलिटी शो वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवला आहे. सीझनच्या सुरुवातीपासूनच छोट्या स्पर्धकांनी आपल्या विलक्षण सादरीकरणाने प्रेक्षकांना खिळवून ठेवलं आहे. शिवाय दर आठवड्याच्या शेवटी कार्यक्रमात प्रथितयश कलाकारांची उपस्थिती या मुलांचा उत्साह आणखी वाढवते. या आठवड्यात अभिनेत्री वहीदा रेहमान आणि आशा पारेख या बॉलीवुडच्या दोन सुंदर अभिनेत्री शोमध्ये हजेरी लावणार आहेत.

या वेळी स्पर्धक आणि त्यांच्या गुरूंनी 90 च्या दशकातील वहीदा रेहमान आणि आशा पारेख यांच्या गाण्यांवर काही सुंदर परफॉर्मन्स केले. दोन्ही अभिनेत्रींनी प्रत्येक परफॉर्मन्स तितक्याच उत्सुकतेने बघितला आणि त्याही भूतकाळात रमल्या. तसेच, आशा पारेख यांनी कबुली दिली की त्यांना संजय लीला भन्सालीचे सर्वच चित्रपट खूप आवडतात आणि त्या त्यांच्या पुढच्या चित्रपटाची आतुरतेने वाट बघतात.

- Advertisement -

त्या पुढे म्हणल्या की भन्सालींचे चित्रपट भव्य असतात आणि ते पाहताना आनंद मिळतो. त्याचबरोबर त्यांनी या शो दरम्यान जून्या आठवणींना उजाळा दिला. शम्मी कपूर आणि शशी कपूर हे त्यांच्या काळातील उत्तम नर्तक होते, तसेच रणबीर, करीना, करिश्मा कपूरसह सर्वांच्या शरीरामध्ये संगीत आणि लय भिनलेली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -