घरमनोरंजनअभिषेक बच्चन शाहरुख खानच्या 'या' चित्रपटात काम करणार

अभिषेक बच्चन शाहरुख खानच्या ‘या’ चित्रपटात काम करणार

Subscribe

या नवीन चित्रपटात अभिषेक कॉन्ट्रक्ट किलरच्या भूमिकेत दिसणार आहे.

बॉलीवूड अभिनेता अभिषेक बच्चन आता बॉलीवूडचा किंग खान शाहरुखच्या चित्रपटात काम करणार आहे. या नवीन चित्रपटात अभिषेक कॉन्ट्रक्ट किलरच्या भूमिकेत दिसणार आहे. याबाबतची माहिती शाहरुख खानच्या रेड चिलीज एन्टरटेन्मेंट या प्रोडक्शन हाऊसने दिली आहे.

- Advertisement -

रेड चिलीज एन्टरटेन्मेंटने ट्विटरवर लिहिले की, नमस्कार आम्ही आमच्या येणाऱ्या चित्रपट बॉब बिस्वास या चित्रपटाची घोषणा करत आहोत. बाऊंड स्क्रिप्ट प्रोडक्शनसोबत आम्ही हा चित्रपट निर्माण करत आहोत. अभिनेता अभिषेक बच्चन याची भूमिका असलेल्या या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी दिया अन्नपूर्णा घोष पार पाडत आहे. या ट्विटला शाहरुख खानने रिट्विट केले आहे. त्याने लिहिले की, आम्हाला आनंद वाटत आहे की, आम्ही बाऊंड स्क्रिप्ट प्रोडक्शनसोबत बॉब बिस्वास हा चित्रपट घेऊन येत आहोत. यामध्ये अभिनेता अभिषेक बच्चन भूमिका पार पाडणार आहेत.

- Advertisement -

कोण आहे बॉब बिस्वास?

बॉब बिस्वास एक पोकर फेस किलर आहे. सरळ शब्दात सांगायचे तर असा खूनी आहे, ज्याचा खून केल्यानंतर चेहऱ्यावरील हावभाव बदलत नाही. या चित्रपटावर अभिषेक बच्चन याने सुद्धा आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. अभिषेकने ट्विट केले की, मी माझ्या पुढील चित्रपट बॉब बिस्वास विषयी सांगण्याबाबत एक्सायटेड आहे. चित्रपटात काम करण्याविषयी मी उत्सुक आहे. अनेकांचा आवडता शाहरुख खानसोबत काम करत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -