Friday, May 7, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन अभिनेत्री स्नेहा वाघला पितृशोक, कोरोनामुळे झाले वडिलांचे निधन

अभिनेत्री स्नेहा वाघला पितृशोक, कोरोनामुळे झाले वडिलांचे निधन

अत्यंत भावनिक पोस्ट शेअर करत स्नेहाने दुख:व्यक्त केलं आहे. स्नेहाने अनेक हिंदी आणि मराठी मालिकांमध्ये काम केलं आहे.

Related Story

- Advertisement -

प्रसिद्ध अभिनेत्री स्नेहा वाघ हिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. वडिलांचे कोरोनामुळे निधन झाले असल्याची माहिती स्नेहाने सोशल मीडिया अकाऊंटवर दिली आहे. स्नेहाने वडिलांचा फोटो शेअर करत 27 एप्रिल या दिवशी तिच्या वडिलांचे निधन झाले असल्याचे लिहलं आहे. तसेच स्नेहा पुढे लिहते की ” माझा सगळ्यात मोठा आधार मी गमावला आहे. न्यूमोनिया आणि कोरोना या आजारांशी महिनाभर सामना केल्यानंतर माझ्या वडिलांचे निधन झाले. अश्या प्रकारचे दुख: वेदना मी कधीही अनुभवल्या नाही. आपण कोणत्या परिस्थितीतून जात आहोत याचा फरक पडत नाही. पण आपल्या पालकांना गमावल्यावर प्रचंड दुख: होतं ”

 

View this post on Instagram

 

A post shared by Sneha Wagh (@the_sneha)

- Advertisement -

तसेच आणखी एक भावनिक पोस्ट शेअर करत स्नेहाने तिच्या वडिलांबद्दल लिहले आहे की,” तुम्ही तुमच्या शब्दांनी लोकांच्या चेहर्‍यावर हास्य उमटवत होतात कारण त्यांचा दिवस आनंदी जावा. तुम्ही खंबीर,मनमिळाऊ आणि चांगले व्यक्ती होतात. तुम्ही आम्हाला आमची किमंत आणि स्वप्न पूर्ण करायला शिकवलं तसेच आत्मविश्वासी आणि धाडसी बनवलं. तुम्ही नेहमीच आम्हाला प्रामाणिक राहा आणि उत्तम व्यक्ती बनायला संगितले होते. हे ऐकून आता कोलमडून जायला होते की आता आम्हाला एकटं राहावं लागणार आहे. तुम्ही आमच्यासाठी नेहमीच हीरो आहात. तुम्हाला शेवटचा निरोपदेखील देऊ शकलो नाही. आम्ही काहीच करू शकलो नाही. आता आयुष्य पाहिल्यासारखे कधीच राहणार नाही” अशी अत्यंत भावनिक पोस्ट शेअर करत स्नेहाने दुख:व्यक्त केलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sneha Wagh (@the_sneha)

- Advertisement -

स्नेहाने अनेक हिंदी आणि मराठी मालिकांमध्ये काम केलं आहे. चंद्रगुप्त मौर्य,वीरा,ज्योती यासारख्या मालिकांमधील स्नेहाची भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली आहेत.


हे हि वाचा – अभिनेता दिलीप कुमार रुग्णालयात दाखल,पत्नी सायरा बानोने दिली माहिती म्हणाली…

- Advertisement -